(माझे हरवलेले गाव)
हरवलेला गाव- – – – – –
लेखक:-
श्री पांचाळ देविदास श्रीनिवासराव
सहशिक्षक-श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय,तुळजापूर. जिल्हा उस्मानाबाद.
आपला गाव आणि गावाकडली माणसं म्हटलं की डोळे पाणावल्याशिवाय राहत नाहीत मनातील गावाविषयी असलेलं प्रेम मातीशी जुळलेली नाळ गावातील लहान थोरांचे असलेलं स्नेहाचं नातं कधी विस्मरण होतं का एखाद्या नववधूला सासरी गेल्यावर आपल्या माहेराची आठवण ओढ कशी लागते तसं काहीतरी भेटी लागी जीवा लागलीसी आस असन काहीतरी पेपर चाळताना कुठली बातमी कुठली घटना आपल्या गावाकडची आहे का पाऊस पाणी कसं आहे पीक पाणी कसं आहे आमची म्हातारी बरी आहे का आपल्या गावची जत्रा कधी आहे आपला कुत्रा मोती कसा आहे माझे कुणी मित्र आले होते का माझ्याबद्दल काय विचारला केली का आपल्या गावचे सरपंच सध्या कोण आहेत असे नानाविध प्रश्न मनात उफाळून येतात तसं पाहता 20 ते 25 वर्ण गावापासून दूर असल्यामुळे हुरहूर वाटते.
महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील डोंगराच्या कुशीत वसलेले सुंदर टुमदार दिसणारे गाव म्हणजे आमचे निटर गाव होय । निटुर या आमच्या गावचे सर्वात मोठी आणि पहिली ओळख म्हणजे जे जे येथील ग्रामदैवत असलेले श्री सादनाथ मंदिर होय अतिशय उंचावर असल्यामुळे चोहोबाजूने पाच पाच किलोमीटर पासून मंदिराचा सुंदर कळस दिसायला सुरूवात होतो मंदिराचे शिखर पाहून आपले गाव आले हे समजते निटरच्या आसपास बारा वाड्या आणि त्या बारा वाड्या चा बाजार म्हणजे निटूर लातूर ते निलंगा या महामार्गावर अगदी रोडवर असलेले गाव लातूर पासून 30 किलोमीटर तर निलंगा पासून 18 किलोमीटर अंतरावर असलेले एक जुन्या काळातील ऐतिहासिक गाव म्हणून आजही ओळखले जाते आमच्या लहानपणी कच्चा रस्ता पायी चालत जाणे छोटे व अरुंद रस्ते सर्व रस्ते चिखल दगड गोट्यांनी भरलेले त्यावेळी पाऊस मुसळधार असे ओढे-नाले नदी तुडुंब भरून वाहत असत लाईट अधून-मधून असायचे दळण दळायची पंचायत गिरण्या बंद असायच्या सायकल वरती पाच ते दहा किलोमीटर पर्यंत जाऊन दळण आणायचे गावातील लोक अत्यंत प्रामाणिक मायाळू कष्टाळू श्रद्धाळू एकमेकावर विश्वास प्रेम सलोखा एकता व एकात्मतेचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे आमचे गाव व गावातील माणसे.
गावात अठरा पगड जातीचे लोक गुण्यागोविंदाने राहात असत बारा बलुतेदार आनंदाने आपले जीवन जगत असत 9 ऑगस्ट 1972 चा माझा जन्म सगळे म्हणत कि दुष्काळात जन्मलेला दोन वर्षाचा असताना वडिलांचा मृत्यू आईने आईने लोकांची धुणीभांडी करून काबाडकष्ट करून सांभाळ केला मोठे भाऊ आणि वहिनींचे वहिनींची माया व आधार मिळाला माझ्या लहानपणीचे सण उत्सव महोत्सव अत्यंत आवडीने व जल्लोषात साजरा होत असत शेतकऱ्यांचा सण वेळ अमावस्या पोळा वेळ अमावस्या दिवशी आम्ही सर्व मित्रमंडळी 10 ते 12 जणांचा ग्रुप प्रत्येकाच्या शेतात जात असत त्या दिवशी किमान दहा वेळा तरी जेवण होत असे गप्पा-गोष्टी चिंच बोरे आवळा पेरू खाण्याचे धमाल करीत असे आमच्या पैकी काहींना पतंग उडवण्याची खूप हाऊस होती ते आनंदाने पतंग उडवत असत व माझ्या हाती दोऱ्याचा रील देत असत वेळ अमावस्या ला शेतात पतंग उडवण्याची परंपरा आहे त्यात विविध आकाराचे नक्षीदार लहान मोठे पतंग असायचे शेतात पाच पांडवाची पूजा केली जात असे झाडाखाली कडव्या पासून खूप बनवायचे खूप तिच्यासमोर सर्वांची जेवणाची पंगत बसे जेवणाचे खास वैशिष्ट म्हणजे भजी रोडगा आंबील भात भाजी गव्हाची खीर अशा प्रकारचे मिष्ठान्न भोजन असायचे सर्वात मोठा आनंद म्हणजे आम्ही लहान लहान सर्व जण बैलगाडी मध्ये बसून शेताला जायचे बैलाच्या गळ्यातील घुंगरांचा आवाज आजही कानी येतो तसेच पोळा हा सण अत्यंत उत्साहात अशाच पद्धतीने साजरा केला जात असे दिवसभर उपवास सायंकाळी बैलांची मिरवणूक संपूर्ण गावभर असे पहिला मान गावातील पाटलांना असे पाटलांच्या बैलांना असे व बैलांची पूजा बैलांचे लग्न लावत असत यामागे कारण काही कळले नाही पण दरवर्षी बैलाचे लग्न आणि तुळशीचे लग्न लावणे ही परंपरा कायम राहिली.
ग्रामदैवत श्री सादनाथ महाराज मंदिर निटूर🙏
आमच्या गावांमध्ये अनेक मंदिरे होती ग्रामदैवत श्री साधनात मंदिर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर श्रीराम मंदिर श्री हनुमान मंदिर श्री बालाजी मंदिर श्री महादेव मंदिर सायंकाळी मंदिरात नित्यनेमाने भजन होत असे कीर्तन व्हायचे ऐकायला शेकडो लोकांचे बायकांची गर्दी होत असे गावाचे दुसरे वैशिष्ट म्हणजे लक्ष्मण शक्ती सोहळा आमच्या गावात वर्षभर रामायण पोती चालत असे व दर वर्षी मोठ्या थाटामाटात लक्ष्मण शक्ती सोहळा होत असे पहाटे चार वाजल्यापासून गावातील चौकात शक्तीला सुरुवात होत असे भव्य मंडप सुंदर रांगोळ्या सडा तोरणे पताके असा जल्लोष असे माझे खूप मोठे भाग्य असे की मला व्यासपीठावर बाल वाचक म्हणून मानाचे स्थान मिळत असे दिवसभर एकाहून एक अप्रतिम वाचक गायक व अर्थ सांगणारे महाराज यांच्या अमृतवाणीतून सुंदर सरळ निखळ रामायण सर्वांना सहज उमजत असे सायंकाळी आरती व महाप्रसाद संपूर्ण गाव प्रसादासाठी येत असे मोठ्या कलईमध्ये खीर भात आमटी असे प्रसादाचे स्वरूप असे आजही त्या महाप्रसादाचे चव व सुगंध जिभेवर परत आहे माझ्या गावातील एकता व एकात्मतेचं आणखी एक उदाहरण म्हणजे गावाची जत्रा होय उन्हाळ्यात अगदी मे महिन्याच्या पहिल्याच सोमवारी गावातील ग्रामदैवत श्री साधनात मंदिरात मोठी जत्रा भरत असे सात दिवस सप्ताह ज्ञानेश्वरी पारायण व शेवटच्या दिवशी सांगता हजारो लोकांच्या महाप्रसादाची व्यवस्था दुसऱ्या दिवशी कुस्त्यांचा फड रंगायचा दुरून दुरून पहिलवान येत असत मध्यंतरी 1993 ला खूप मोठा महाभयंकर असा भूकंप झाला तेव्हापासून गाव विस्कळीत झाले गावातील माणसे विस्कळीत झाली दूर दूर शेतामध्ये जाऊन राहू लागले मनसे माणसापासून दुरावली गेली काही गाव सोडून गेली तर कायमचीच सोडून गेली आज वीस-पंचवीस वर्षांनंतर गावात गेल्यानंतर गावाचा पूर्ण कायापालट झालेला दिसून येतो गावात पक्के रस्ते मोठी बाजारपेठ पक्की सडक गावभर नाल्या स्वच्छता व साफसफाई पूर्वे गावाच्या चौकातील कट्ट्यावर जुनी मंडळी गप्पा मारत बसायचे ती आज दिसेनाशी झाली.
आज गाव बदलला गावातील माणसे बदलली काळ बदलला दळणवळणाची भरपूर साधने झाली त्यावेळी एक रुपया म्हणजे खूप मोठा होता मिळत नव्हता पण आज व्यापार वाढला आर्थिक सामाजिक प्रगती झाली पण दुःख एका गोष्टीचं वाटतं की चांगली मूल्य संस्कारित अनुभवी तज्ञ माणसे राहिली नाहीत व्यसनाचे प्रमाण वाढले पान तंबाखू गुटखा दारू पिणे सिगारेट ओढणे त्यातच मोबाईल तंत्रज्ञानात घडवून जाणारे तरुण पिढी आणि माणसाला अहंकाराची झालर चढली अलीकडील काळात नवीन पिढीचे नवीन विचार पुढे आलेले काही जण व्यवसाय नोकरीनिमित्त बाहेर पडले ते बाहेरच आज राहिल्या त्या फक्त आठवणी पण आज गावात गेले की हरवल्यासारखं वाटतं नवीन कुठेतरी गेल्यासारखं वाटतं मनाला कुरकुरी वाटते आपला जुना गाव बघून आज मनाला खंत वाटते. . . !
धन्यवाद🙏🙏