लेखक:-
श्री पांचाळ देविदास श्रीनिवासराव (सर)
सहशिक्षक-श्री तुळजाभवानी सैनिकी विद्यालय, तुळजापुर. जिल्हा उस्मानाबाद.
आज 14 नोव्हेंबर बाल दिन म्हणून साजरा केला जातो आपल्या भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांची जयंती ती म्हणजेच बाल दिन होय पंडित नेहरूंना मुले आणि फुले खूप खूप आवडत असत ते मुलावर खुप खुप प्रेम करत असत ते मनात मुलांना मोकळे स्वतंत्र पणाने राहू द्या फुलासारखे फुलू द्या स्वच्छंद मनाने आकाशात विचरण करू द्या मुले म्हणजे देवाघरची फुले होत अशा या महान नेत्याची आज जयंती ती बाल दिन म्हणून साजरी केली जाते आजच्या या बालदिन ए सर्व बालकांना मनःपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
आज शुभ दीपावली नरक चतुर्दशी अभ्यंग स्नान व दीप अमावस्या तसेच बाल दिन असा महान परवाचा दिवस आहे सर्वजण आनंदात दिवाळी साजरी करीत आहेत आजच्या या बालदिनी सर्व बालकांचे आचार-विचार मूल्यसंस्कार वृद्धिंगत होवो याच साठी छोट्या बालकावर मुलावर संस्कार कसे करावे यासाठी एक छोटासा लेख आपल्यासमोर सादर करीत आहे बालकांवर संस्कार करताना लहान मूल म्हणजे चिखलाचा गोळा त्याला द्यावा तसा आकार देता येतो घडवावेत असे घडविता येते ज्याप्रमाणे गरम लोखंडावर घालावा आणि वाटेल तसा आकार प्राप्त करावा तसं तर मुळातच आपले घर म्हणजे मुलांचे संस्कार केंद्र आहे तेव्हा हे संस्कार केंद्र चांगलेच असले पाहिजे आई-वडील हे त्यांचे प्रथम केंद्र वडिलांपेक्षा आईची श्रेष्ठ असते राजमाता जिजाऊ ने छत्रपती शिवाजी महाराजांना घडविले साने गुरुजींना त्यांच्या आईनेच घडविले राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्यासारखे तत्त्वज्ञ आईमुळेच घडले मुलावर चांगले योग्यवेळी सुसंस्कार करणे हे आई-वडिलांचे पालकांचे आद्यकर्तव्य आहे.
आधुनिक समाजात मूल्य शिक्षण तसेच नैतिकतेच्या शिक्षण देणे भाग पडत आहे प्राचीन काळी मूल्यशिक्षण हे आपोआप घराघरातून मिळत असे एकत्र कुटुंब पद्धती आणि घरातील मोठी माणसे आजी आजोबा यांच्या प्रत्यक्ष वागण्यावरून संस्कार घडत असतात आज पहाटेपासून उठल्याबरोबर मुले टीव्ही पुढे बसलेली दिसतात टीव्ही हीच त्यांच्यासाठी देव होऊन बसली आहे पहाटेच्या जात्यावरील ओव्या भजन भारुड देवपूजा दानधर्म तसेच गाईची पूजा हे सगळं विसरून जात आहेत याप्रमाणे लहान मुलावर संस्कार करताना संपूर्ण जबाबदारीने केले पाहिजे पालकांनी स्वतः विशेष काळजी घेतली पाहिजे आपल्या वागण्यातून प्रत्यक्ष सत्य अहिंसा भूतदया सत्संग व्यसनापासून दूर राहण्याची शिकवण दिली पाहिजे आजच्या बालदिनी आई माझा गुरु आई कल्पतरू सौख्याचा सागरू आई माझी बालकावर संस्कार हे चांगले व योग्य झाले पाहिजेत.
आपला देश आपला समाज संस्कृती आपली प्रार्थना आपले घर आपली माणसे आपली नाती या संदर्भातील सखोल मार्गदर्शन बालकांना झाले पाहिजे व आपल्या बालकांचा सर्वांगीण विकास कसा साधता येईल याचा सातत्याने प्रयत्न केला पाहिजे आधुनिक काळात व्यसन विविध सवयी गैरवर्तन याचा बालमनावर परिणाम होत आहे वाईट संस्कार हे जास्तीत जास्त लवकर होतात तर चांगल्या संस्कारांना खूप वेळ लागतो बालकावर संस्कार घडत असताना पालकांनी अत्यंत जागरूक व जबाबदारीने वागले पाहिजे मुलांचा कल ओळखून त्या त्या क्षेत्रात त्यांना संधी उपलब्ध करून दिली पाहिजे शाळेचा व अभ्यासाचा बाऊ करू नये व सतत मुलांपुढे आपलाच मोठेपणा सांगू नये पालकांनी प्रथम आपल्या घरात प्रत्येक घटकांची चांगले वर्तन करावे बालकांना चांगली पुस्तके वाचायला देणे वाचनालयाची ग्रंथालयाची ओळख करून देणे महान समाजसुधारक विचारक तत्त्वज्ञ लेखक यांचे जीवन चरित्र सांगितले पाहिजे त्यांच्या लहान वयातच रामायण-महाभारत श्रावणबाळ भक्त प्रल्हाद ध्रुवबाळ छत्रपती शिवाजी महाराज राजर्षी शाहू महाराज महात्मा फुले महात्मा गांधी डॉक्टर आंबेडकर यांच्या चरित्रावरील पुस्तके माहिती कथा गोष्टी सांगितल्या पाहिजेत व बालकावर तसे मूल्य संस्कार रुजवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
पंडित जवाहरलाल नेहरूंना लहान मुले खूप आवडायचे त्याच बरोबर गुलाबाची फुले ही त्यांना खूप खूप आवडायचे गुलाबाच्या फुलाप्रमाणे मुलेही हे नाजूक सुंदर विचारांची असतात त्यांच्या सुंदर विचारांना अधिक प्रभावी प्रबळ शक्तिशाली करण्यासाठी प्रत्येकाने चांगले विचार चांगले आचार चांगली कृती चांगले उपक्रम त्यांच्यासमोर केले पाहिजेत याचाच परिणाम म्हणून बालकांच्या बालमनावर संस्कार घडतात व ते भविष्यात सुजान नागरिक बनतात जेणेकरून समाजाचा विकास देशाचा विकास झपाट्याने होतो मुले शिक्षणाकडे वळतात विज्ञानाकडे वळतात आधुनिक ज्ञानाकडे वळतात आज आधुनिक काळात जगासमोर टिकायचे असेल तर या बालकांना तंत्रज्ञान विज्ञान तत्त्वज्ञान अशा विषयांचा अभ्यास देणे गरजेचे आहे.
आजचे युग हे स्पर्धेचे युग आहे या स्पर्धेत आपला बालक घेतला पाहिजे आपला बालक स्पर्धेत उतरला पाहिजे यासाठी सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत तरच या बालदिनाचे महत्त्व आपल्याला समजेल व खरोखरच बाल दिन साजरा झाला असेच म्हणावे लागेल बालकांना संस्कार शिकवण्याचे पूर्ण जबाबदारी ही शाळेचे नाही शाळेपेक्षा विद्यार्थी हे जास्तीत जास्त काळ घरात तसेच समाजात वावरतात मुलेही संस्कारशील असल्यामुळे समाजात काय चालले आहे घरात काय चालले आहे याची त्याला पटकन जाणीव होते काय खरे काय खोटे कोण चांगला कोण वाईट याचे ज्ञान त्याला होते निसर्गतः मुले ही हळूहळू शरीराने मोठी होतात पण फक्त मोठी होण्यापेक्षा संस्कारांची जडणघडण होत मोठे होणं हे महत्वाचं आहे.
ग्रामीण भागापेक्षा शहरी जीवन हे खूपच व्यस्त असते सर्व जण आपापल्या कामात असतात शिवाय विभक्त कुटुंब पद्धतीमुळे या मुलांच्या संस्कारावर फार मोठा फटका बसला आहे कारण मुलांना मिळणारे प्रेम वात्सल्य नैतिक मूल्य शिकवण याला घरात मोठी माणसेच उरलेली नाहीत ते कुठेतरी स्वतंत्र किंवा वृद्धाश्रमात राहतात आपली मुलं या ना त्या कारणाने आपल्या हातून निसटून पुढे जाऊ नयेत भारतीयांचे भविष्य घडविण्याचे सामर्थ्य आपल्या या तरुणाईत आहे देशाचा मुख्य कणा म्हणजे आजचा तरुण आहे आणि योग्य संस्कार आविना तो दिशाहिन बनत चालला आहे देशाचा आधारस्तंभ आजचा बालक उद्याच्या भारताचे भविष्य आहे देशाची शक्ती आहे देशाचा मान आहे देशाचा सन्मान आहे अशा या बालकावर खूप खूप चांगले संस्कार घडणे आवश्यक आहे आज भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त बाल दिनानिमित्त पुनश्च एकदा त्यांना कोटी कोटी विनम्र अभिवादन तसेच सर्व बालकांना शुभ दिपावली व दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा…।
धन्यवाद . . . !