29.9 C
Solapur
September 27, 2023
अक्कलकोट

बोरगाव येथे महिलांचे हिमोग्लोबिन. तपासणी व जनावरांचे लसीकरण शिबिर संपन्न.

अक्कलकोट ( प्रतिनिधी )

जागतिक महिला दिनानिमित्त महिलांचे हिमोग्लोबिन. तपासणी व जनावरांचे लसीकरण व आरोग्य तपासणी शिबिर बोरगाव दे येथे घेण्यात आले. यावेळी 51 महिलाच गौरव करण्यात आला.

महिला आर्थिक विकास महामंडळ सोलापूर अंतर्गत श्री स्वामी समर्थ सीएमआरसी अक्कलकोट अंतर्गत माविमचे जिल्हा समन्वयक अधिकारी सोमनाथ लामगुंडे याच्या मार्गदर्शन खाली जागतिक महिल निमित्त सदरचा कार्यक्रम बोरगाव येथे घेण्यात आला. यावेळी महिलाचे आरोग्य तपासणी व जनावरांचे लसीकरण व आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचे उदघाटक पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी .दिनेश मुरूमकर व बोरगावचे सरपंच विलासराव सुरवसे याच्या हस्ते करण्यात आले .यावेळी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन सीएमआरसी अध्यक्ष सुलोचना गवी व ग्रामसंघच्या अध्यक्ष स्वरांजली बिराजदार याच्या हस्ते करण्यात आले.

या शिबिराचे नियोजक सीएमआरसी व्यवस्थापक विनोद राठोड व सहयोगिनी .आरोग्य सेविका श्रीमती सरसंबी , आशा वर्कर., अंगणवाडी सेविका याचे सहकार्य लाभले .यावेळी.बचत गटातील 50 महिलाचे हिमोग्लोबीन . तपासणी करण्यात आली. गावातील शेळी ,बैली ,गाय,म्हैस या सर्व प्रकारच्या जनावावरचे लसीकरण व आरोग्य तपासणी करून मोफ़त औषधे, गोळ्या देण्यात आले . हे शिबीर यशस्वी रित्या पार पाडण्यात आले. या वेळी बोरगावचे ग्रामस्थांनी शिबिर आयोजकांचे आभार मानले.

Related posts