उस्मानाबाद 

तेर येथील अभ्यासिका तात्काळ सुरू करण्यासाठी शिवसेनेचे तालुकाप्रमुख सतीश सोमाणी व मा. सरपंच मुन्ना खटावकर यांचा आत्मदहनाचा इशारा.

पुरूषोत्तम विष्णू बेले – जिल्हा प्रतिनिधी.

धाराशिव (उस्मानाबाद) – मौजे तेर, ता. जि. धाराशिव (उस्मानाबाद) येथील अभ्यासिका तात्काळ चालू करण्यासाठी धाराशिवचे शिवसेना तालुकाप्रमुख सतीशकुमार सोमानी व माजी सरपंच मुन्ना खटावकर यांनी आत्मदहनाचा इशारा दिला.

मौजे तेर येथील अभ्यासिका तात्काळ चालू करण्यात यावी असे निवेदन यापूर्वी दिनांक 15 फेब्रुवारी 2021 रोजी दिले असतानादेखील अजून अभ्यासिका चालू झाली नाही. मात्र त्यावर अभ्यासिका तात्काळ चालू करणे ऐवजी ग्रामपंचायत कार्यालय तेर हे सदरील अभ्यासिका ही स्थानिक जिल्हा परिषद सदस्या व स्थानिक सरपंच ग्रामपंचायत तेर त्यांच्या आकसबुद्धीने काढून टाकत आहे.

सदरील अभ्यासिक चालू करण्यासाठी साठी रुपये 5 लक्ष खर्च झालेला असून त्यामुळे शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान होणार आहे अभ्यासिकेचे चे काम पूर्ण होऊन एक वर्ष झालेले असून सुद्धा त्याचा लोकार्पण सोहळा करण्यात आलेला नाही त्यामुळे ही विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान झाले आहे आहे.

सदर अभ्यासिका अनधिकृतपणे काढणाऱ्या व्यक्तीवर कायदेशीर कारवाई करून अभ्यासिका तात्काळ चालू करण्यात यावी अन्यथा आम्हाला नाविलाजास्तव आत्मदहन करावे लागेल असा इशारा शिवसेना तालुका प्रमुख सतीश कुमार सोमानी व माजी सरपंच मुन्ना खटावकर यांनी केला आहे.

Related posts