बोरघर / माणगाव ( विश्वास गायकवाड ) सध्या देशात कोरोना मूळे लॉकडाऊन आहे.संपुर्ण देश व जग कोरोनाने हैराण झाले आहे.संपुर्ण जग शांत असताना राम मंदिर ट्रस्ट मात्र मंदिर निर्माण कामात व्यस्त आहे. त्यासाठी जमीन समतल करण्यासाठी खोदकाम करत असताना सम्राट अशोक कालीन बुद्ध नगरी साकेत सापडली.असा दावा बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क च्या माध्यमातून केला जात आहे.
या बाबतचे सविस्तर वृत्त असे की राम मंदिर बाबरी मशीद या वादा बाबत काही दिवसापूर्वी सुप्रिम कोर्टाने दिलेल्या निर्णयामुळे शासनाने मंदिर ट्रस्ट निर्माण करून विवादित जागा ट्रस्ट ला देऊ केली. जग शांत असताना व कोरोना महामारीचे संकट देशावर आले असताना घाई घाईत राम नवमीच्या मुहूर्तावर मंदिर निर्माण कार्य सुरू करण्यात आले.त्यासाठी जमिनीचे खोदकाम सुरू झाले असता त्या ठिकाणी बौद्ध कालीन वस्तू मोठ्या प्रमाणात सापडल्या आहेत. व अजून सापडत आहेत . ही जागा पूर्वीची साकेत नगरीची असून बुद्ध तीन वेळा तिथे प्रवचन करण्यासाठी आले असल्याची नोंद चिनी प्रवासी फा हेन याने नोंद करून ठेवली आहे. तसेच बौद्ध धमाचे मुख्य केंद्र साकेत असल्याचे सुध्दा फा हेन चे म्हणणे आहे. त्याठिकाणी सम्राट अशो

काने धम्म स्तंभ उभारला असून तो पुष्य मित्रा शुंग द्वारा नष्ट केला गेला आहे.खोद कामात सापडलेल्या स्तंभला शंकराची पिंड असल्याचा दावा केला जात आहे मात्र हे सारे खोटे असून राम जन्म भूमीत रामाच्या अस्तित्वा बाबत या ठिकाणी सुरू असलेल्या खोदकामात एकही पुरावा सापडत नाही.याचा अर्थ ती अयोध्या नसून ती सम्राट अशोक कालीन ऐतिहासिक बुद्ध नगरी साकेत असल्याचे सिद्ध होत आहे.बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कच्या माध्यमातून आमची मागणी आहे की,मंदिर निर्माण कार्य त्वरित थांबवून सदरची जागा पुरातत्व खात्याकडे वर्ग करावी व इन कॅमेरा त्या जागेचे उत्खनन करावे व ज्या गोष्टी सापडतील त्या जगा समोर आणाव्या.तसेच शासन निवेदन देऊन ऐकत नसेल तर त्यासाठी सुप्रीम कोर्ट व युनोमध्ये जाण्याची तयारी सुद्धा बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्क करत आहे.
रायगड जिल्हा अध्यक्ष कासे सर यांनी माहिती देताना सांगितले की केवळ न्यायालयीन लढाईने हा प्रश्न सुटणार नसून त्या साठी रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल.त्यासाठी तमाम बौद्ध बांधवाना नम्रपणे आवाहन करण्यात येते की ही लढाई आपल्या अस्तित्वाची आहे तसेच आपण सर्व बौद्ध बांधव एकत्र येऊन मोठे जनआंदोलन उभे करू या. बुद्ध ही भारतीयांची विरासत असून तमाम sc, st,,obc यांची विरासात आहे .त्यामुळे या लढाईत बहुजन समाज आपल्याला मदत करेल ,मात्र ढाल बौद्ध समाजाला व्हावे लागेल.आम्ही आमच्या विरासातीसाठी प्राणाची बाजी लावण्यासाठी तयार आहोत असेकासे सर पुढे म्हणाले.