गेल्या अडीच महिन्यापासून विडी उद्योग बंद असल्याने ६५ हजार महिला विडी कामगार अडचणीत आल्या आहेत , देश अनलॉक झाल्यानंतर विडी उद्योगाला परवणीगी देण्यात आलीय , सोलापूर शहरात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर महानगरपालिकेनेही काही अटी शर्थीवर या उद्योगाला परवानगी दिलीय ,मात्र सोलापूर प्रशासनाने घातलेल्या अटी शर्थीमध्ये उद्योग सुरु करण्यास विडी कारखानदारांना श्यक्य नसल्याने अद्याप उद्योग सुरु झाला नाही , कामगारांची उपासमार होत असल्याने उद्योग लवकर सुरु करा अन्यथा रस्त्यावर उतरण्याचा इशारा कामगार संघटनांनी घेतलाय VO :- सोलापूर शहर हे कामगारांच्या वसाहतीचे शहर म्हणून ओळखले जाते , सोलापुरातील चादर टॉवेल उद्योगाबरोंबर विडी उद्योग हि मोठ्या प्रमाणात चालतोय , विडी उद्योगात ६५ हजार महिला काम करतात , गेल्या दीड महिन्यापासून लॉक डाउन असल्याने हा उद्योग ठप्प आहे , देश अनलॉक झाल्यानंतर विडी उद्योग सुरु करण्यास परवानगी देण्यात आली ,सोलापुरात करोनाचे संकट सतत घोघावतेय त्यामुळे सोलापुरातील विडी उद्योगालाही सोलापूर प्रशासनाने काही अटी शर्थीवर परवानगी दिली, , त्यातच विडी क्षेत्रात काम करणाऱ्या महिला या शाररिक दृष्ट्या कमकुवत असतात, त्यामुळे सोलापूर प्रशासनाने कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महिलांना घरपोच विडी पान , तंबाखू पोहच करून तयार विडी हि त्याच्या घरातूनच संग्रहित करण्याचे आदेश दिलेत ,
आतापर्यंत विडी कामगार हे कारखान्यावर येऊन विड्याचे माप द्यायचे आणि जाताना विडी बनवण्यासाठी लागणार कच्चा माल घेऊन जायचे , करोना संसर्ग च्या च्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने विडी कामगारांच्या घरी विडी पान तंबाखू पोहच करून तेथून विडी गोळा करण्याचे आदेश दिले आहेत , या आदेशाला विडी कारखानदारांनी विरोध केलाय ,६५ हजार महिलांच्या घरी माल पोहच करणे आणि विडी गोळा करणे श्यक्य होऊ शकत नाही ,प्रशासनाने यावर योग्य योग्य तोडगा काढून उद्योग सुरु करावा अशी मागणी विडी कारखानदारांनी केलीय -पी शिवशंकर , आयुक्त , सोलापूर महानगरपालिका
६५ हजार महिला विडी कामगार आपल्या कामावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात , गेल्या अडचणीत महिन्यात सरकारकडून केवळ दोन हजार रुपये मदत मिळालीय , उद्योग बंद असल्याने त्यांच्या कुटुंबाची उपासमार होतेय , गेल्या अडीच महिन्यापासून हाताला काम नाही त्यात घर कसे भागवायचे यातून त्यांच्या संयमाचा बांध फुटलाय , विडी कामगार महिलांनी आज एकत्र येऊन सिटू कार्यालयासमोर येऊ कामगार नेते माकप चे माजी आमदार नरसय्या आडम यांच्या समोर आपल्या व्यथा मांडल्या आणि प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली , राज्यभरातील विडी उद्योग सोशल डिस्टंसिंग ठेवून चालू आहे , सर्वात मोठा विडी उद्योग सोलापुरात आहे मात्र प्रशासनाच्या अडेलतट्टू मुळे बंद आहे , हा उद्योग लवकर सुरु करून महिलाच्या हात काम द्या अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा कामगार संघटनेने — सुनील क्षत्रिय , सचिव , सोलापूर विडी उद्योग संघ , सोलापूर
विडी उद्योगात घरी बसून काम करणारा महिला वर्ग मोठ्या प्रमाणात आहे , गेल्या अडीच महिन्यापासून या महिलांच्या हाताला काम नाही आता यांच्या कुटुंबाची उपासमार व्हायला लागलीय , करोना संसर्ग हि कसा रोखता येईल आणि उद्योह हि कसा सुरु करता येईल मार्ग काढणे गरजेचे आहे- नरसय्या आडम मास्तर , कामगार नेते , माकप चे माजी आमदार