तुळजापूर

ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर तुळजापूर तालुका शिवसेनेची बैठक संपन्न.

प्रतिक शेषेराव भोसले
सलगरा (दि.), प्रतिनिधी

तुळजापूर तालुक्यातील होऊ घातलेल्या आगामी ग्रामपंचायत निवडणूकी संदर्भात दिनांक २३ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजता तुळजापूर शिवसेना शहर मध्यवर्ती कार्यालय मध्ये शिवसेना जिल्हा प्रमुख तथा आमदार कैलास दादा पाटील त्याच बरोबर धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपजिल्हा प्रमुख विजयकुमार सस्ते यांच्या अध्यक्षतेखाली व तुळजापूरचे शिवसेना तालुका प्रमुख जगन्नाथ गवळी, तुळजापूर शहर प्रमुख सुधीर कदम आणि माजी उप -जिल्हाप्रमुख शाम पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये तुळजापूर शिवसेनेची बैठक घेण्यात आली,

यावेळी येणाऱ्या काळात शिवसेना पक्ष खंबीरपणे ग्रामपंचायत निवडणुकीत सामोरा जाणार असून ज्या ठिकाणी महाविकास आघाडी शक्य असेल त्या ठिकाणी महाविकास आघाडी सोबत ज्या ठिकाणी महाविकास आघाडी शक्य नाही अश्या ठिकाणी शिवसेना स्वबळावर लढणार असल्याचे या बैठकीत निर्णय घेण्यात आला.

यावेळी शिवसेना उप-तालुकाप्रमुख सुनिल जाधव, प्रदीप मगर, संजय भोसले, रोहित चव्हाण, युवा सेना माजी तालुका प्रमुख ज्ञानेश्वर घोडके, शिवसेना सोशल मीडिया तालुका प्रमुख चेतन बंडगर, उपशहरप्रमुख बापुसाहेब नाईकवाडी, विभागप्रमुख दगडु शिंदे, महेंद्र सुरवसे, मुकुंद तोडकरी, कालिदास नाईकवाडी, अर्जुन साळुंके, विश्वनाथ दरेकर, बलभिम श्रीगिरे, बालाजी पांचाळ, अमोल गवळी, दत्तात्रय गवळी, सिद्राम कारभारी, जितेंद्र माने, आमिर शेख, सचिन मोरे, भरत मगर, भिवाजी सावंत, विकास सुरवसे, अमोल घोटकर, समाधान ढवळे, संजय चव्हाण, विठ्ठल नागमोडे यांच्या सह अनेक शिवसैनिक बांधव उपस्थित होते

Related posts