साईनाथ जगन्नाथ गवळी
तुळजापूर/उस्मानाबाद(धाराशिव)
प्रतिनिधी.
6 डिसेंबर रोजी संपूर्ण भारतात संविधान निर्माते ,विश्वभूषण,डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त विनम्र अभिवादन करण्यात येते. त्याचप्रमाणे तुळजापूर येथील सैनिकी विद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.
श्री तुळजाभवानी सैनिकी माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय तुळजापूर येथे याप्रसंगी प्रथमता डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे प्राचार्य श्री घोडके व्ही.बी. व जेष्ठ शिक्षक श्री सुरवसे भीमा यांच्या हस्ते करण्यात आले. विद्यालयाचे प्राचार्य, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी यांच्या उपस्थितीत महामानवाला अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी विद्यालयातील हिंदी विषय शिक्षक डॉ. विजय वडवराव यांनी मनोगत व्यक्त करताना बाबासाहेब आंबेडकरांचे सामाजिक,आर्थिक,राजकीय, शैक्षणिक, धार्मिक, स्त्रीविषयक कार्य, शेतीविषयक कार्याचे महत्त्व व आवश्यकता व्यक्त केली. समता ,बंधुता , न्याय, समान हक्क या संविधानातील लोकशाही मूल्यांचे ज्ञान होण्यासाठी तसेच त्यांचा प्रचार व प्रसार, करण्यासाठी संविधानाच्या वाचनाची अपेक्षा व्यक्त केली.
श्री तुळजाभवानी सैनिकी माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय तुळजापूर येथे याप्रसंगी प्रथमता डॉक्टर भीमराव आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे प्राचार्य श्री घोडके व्ही.बी. व जेष्ठ शिक्षक श्री सुरवसे भीमा यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी विद्यालयातील शिक्षक श्री सुरवसे भीमा, श्री वाडीकर सुनिल, श्री स्वामी रमाकांत, श्री पांचाळ देविदास ,श्री पडणूर राजेश, श्री बिलकुले राजेश, श्री सुत्रावे तुषार, श्री चव्हाण सुनिल,श्री श्रीनिवास कदम ,डॉ. विजय वडवराव, श्रीमतीअक्काताई पाटील , श्रीमती सारिका तोडकरी, कु.नालंदा माने, तसेच श्री कुलकर्णी हरीभाऊ , श्री लोंढे राजाभाऊ, श्री रणदिवे सुशांत, श्री ममदे माधव , श्री जेटीथोर पांडुरंग ,श्री देवकुळे रमेश, मगर मामा, भोसले आकाश इ.कर्मचारी उपस्थित होते.