सूक्ष्म पीक पोषक अन्नद्राव्यांची कार्ये जैवरासायनिक क्रियेत महत्वाचे असते. त्यांचे प्रमुख कार्ये व लक्षणे खालील प्रमाणे आहेत.
१)लोह (Iron)-
कार्ये-
प्रकाश-संश्लेषणक्रिया वृद्धींगत करण्यासाठी लोह उपयुक्त ठरते. वनस्पतींच्या जीवनात ज्या विविध जैव-रासायनिक क्रिया चालू असतात त्यांना विकारांची आवश्यकता असते. विकारांच्या क्रियेत लोहाचा प्रामुख्याने उत्प्रेरक म्हणून सहभाग असतो. लोहामुळे प्रथिनांच्या निर्मित्ती कार्यास देखील चालना मिळते.
लक्षणे –
लोह कमतरतेची लक्षणे मॅग्नेशियमकमतरततेसारखी दिसतात. लोहाच्या कमतरतेमुळेपानांत पुरेसे हरितद्रव्य तयार होत नाही, त्यामुळे नवीन येणारी कोवळी पाने पिवळसर दिसतात व नंतर पाने गळून पडतात. पानांच्या शिरा मात्र हिरव्या राहतात. प्रथिनांचे प्रमाण कमी होवून विद्राव्य जैव नत्राचे प्रमाण वाढते.
२) मंगल (Manganese)-
कार्ये-
मंगल पानातील हरितद्रव्याचे घटकद्रव्ये आहे आणि म्हणून प्रकाश-संश्लेषण क्रियेवर या अन्नद्रव्यांचा परिणाम होतो.
लक्षणे –
पिकांच्या पानांच्या शिरा हिरव्या व शिरांमधील भाग क्रमाक्रमाणे पिवळा, नंतर पांढरट व करडा होतो. पानांमध्ये हरितद्रव्य व हरितलवक कमी होते. कोवळी पाने फिक्कट पिवळसर दिसतात.
३) जस्त(Zinc)-
कार्ये-
पिकांच्या विविध जैव-रासायनिक क्रिया होण्यासाठी जस्ताचे फार महत्व आहे. विकरांचे कार्येवनस्पतीवर्धकांची तसेचसंप्रेरकांची निर्मित्ती आणिप्रथिनेयुक्त पदार्थ निर्माण करण्यासाठी जस्ताला खूप महत्व आहे.
लक्षणे –
वनस्पतीची पाने पिवळी पडून कमजोर होतात. पानांचे आकारमान कमी होते. पानांच्या शिरांच्या मधल्या भागातील ऊती मरतात. शेंड्याकडील पाने खुजी होतात. फळांचा आकार बिघडतो. पानांच्या कडा वेड्यावाकड्या दिसतात. शेंडा व खोडांच्या लांबीवर परिणाम होतो. कळ्या सुरकुतलेल्या असतात. पेरे लहान पडतात.
४) तांबे (Cupper)-
कार्ये-
वनस्पतींच्या वाढीसाठी ज्या अनेक जैव-रासायनिक क्रिया चालू असतात त्यांना विकरांची आवश्यकता असते. अशाअनेकविकारांचा तांबे हाएक मुख्य घटक आहे. अशा क्रिया तांब्याच्या क्रिया तांब्याच्या पुरवठ्यामुळे होतात.विशेषकरून प्रथिनांची तसेच `अ`जीवनसत्वाचीनिर्मितीवाढते. पिकांच्या श्वसनक्रियेत तांबे नियंत्रकाचे कार्ये बजावते.
लक्षणे–
कोवळ्यापानांच्याशिरांमधील हरितद्रव्य कमी होते. पिकांच्या शेंड्याची वाढ खुंटते व पाने गळून पडतात.पाने अरुंद वाटतात . पानांचेटोक व कडा फिक्कट पिवळ्या दिसतात. लिंबूवर्गीय फाळझाडात नवीन वाढ खुंटते. फळांवर तांबुस करडे ठिपके दिसतात. मुळांवरील गाठी तयार होण्याची क्रिया मंदावते.
५) बोरॉन-
कार्ये-
वनस्पतींची वाढ, फुलोरा, आणिफलधारणा या क्रियांसाठी विविध जैविक पदार्थांचीगरज असते. पिष्टमय पदार्थांची निर्मिती, त्यांचे चयापचय आणि ते एका ठिकाणाहून दुसऱ्याठिकाणी वाहून कार्यात बोरॉन उपयुक्त ठरते. द्विदल वर्गातील पिकांत प्रथिनांचे प्रमाण तसेच धान्यांमध्येतेलांचे प्रमाण बोरॉनमुळे वाढते.
लक्षणे–
टोकांवरील नवीन पालवीचा रंग देठाकडून फिक्कट होऊ लागतो. बोरॉनची जास्त कमतरता असल्यास वाढणारी कळी मरते. परागकणांची निर्मिती व फलधारणा कमी होवून फळे कमी लागतात. पिकांच्या शेंड्याकडील पाने मरतात. कंदफळांचा गाभा काळा पडतो.
६) मॉलिब्डेनम-
कार्ये-
या अन्नद्रव्यामुळेनायट्रेट नत्राचे रुपांतर प्रथिनांमध्ये होते. दिव्दल वनस्पतीतजैविक पद्धतीने नत्र-स्थिरीकरणकार्यास या अन्नद्रव्यामुळे चालना मिळते. म्हणून या अन्नद्रव्याच्या पुरेशा पुरवठ्यामुळे नत्र-स्थिरीकरण तसेच प्रथिनांची निर्मिती वाढते.
लक्षणे–
मॉलिब्डेनमच्याकमतरतेची लक्षणे नत्राच्या कमतेसारखी दिसतात. पाने फिक्कट हिरवी दिसतात, पानांच्या खालच्या भागातून तपकिरी डिंकासारखे द्रव स्रवते. वनस्पतींची वाढ खुंटते, पाने पिवळसर निस्तेज दिसतात. पानांच्या शिरामधल्या जागेत प्रथम पिवळसर किवांथोडासा नारंगी रंग दिसतोव तो सर्व पानांवर पसरवतो. जास्त कमतरता असल्यास पानगळ होते.
७) क्लोरीन-
कार्ये-
प्रकाश-संश्लेषणक्रियेत क्लोरीनचा महत्वाचा सहभाग असतो.
लक्षणे–
वाढ खुंटते व बाजूच्या मुळांना फुटवे फुटतात. नवीन पानांवर पिवळेपणा दिसतो, पाने पिवळी, कुरडी पडतात. नारळाची झाडे बुरशीजन्य रोगांना बळी पडतात.