आम्ही आज आमचं पुरुषत्व नेहमी सिद्ध करीत असतो.नव्हे तर या पुरुषत्वाच्या नेहमी डिंगा मारत असतो.स्वतःला सिद्ध करण्यासाठी आम्ही आमचे अत्याचार नेहमी करीत असतो. पुर्वीपासून तर आजपर्यंत आणि आजही याच पुरुषत्वाच्या मानसिकतेत स्रीयांना कमजोर समजणारे घटक उपलब्ध आहेत.ह्या घटकांना नेहमी अत्याचार केलेला आवडत असतो.
पुरुषी अत्याचाराची शिकार झालेली स्री कालपासून तर आजपर्यंत त्यांचे अत्याचार झेलीतच आलेली असून आज स्री प्रत्येक क्षेत्रात सृदृढ झाली असली तरी अत्याचाराची चरणसीमा कमी झालेली नाही.एक उदाहरण देतो.एक शहर होतं. नावाजलेलं शहर……..त्या शहरात पती पत्नी राहात होते.ते पती पत्नी गुण्यागोविंदाने राहात होते.त्यांना दोन मुलंही होती.त्याच्या पत्नीचं नाव श्रद्धा होतं.त्याची पत्नी तरुणपणापासून इतर स्रीयांवरील पुरुषी अत्याचार दूर करीत होती.पण काळ गेला.बदलत्या काळानुसार ती अपंग झाली.कारण तिला अपघात झाला होता.त्या अपघातात तिचे दोन्ही पाय गेले होते. त्या अपघातानं तिच्या कार्यावर बंधन आलं. तिच्याने कार्य करणं मुश्कील झालं.अशातच ती अधू झाली.
आपल्या पत्नीची अशी अवस्था.खरं तर गुण्यागोविंदाने नांदणारं जोडपं.त्यांचा संसार व्यवस्थीत चालला असला तरीपण त्या जोडप्यामधून एक जरी चाक पंचर झालं असलं,त्या पंचर चाकाला सोबत घेऊन पतीनं पुढील आयुष्य कापायला हवं होतं.पण पती तो…….पुरुषी रक्त होतं त्याच्यात.त्यामुळं ती अपंग होताच ते पुरुषी रक्त जागृत झालं नव्हे तर या रक्तानं दोन पत्नीही केल्या.
राब राब राबून,पोटाला चिमटा घेवून जमवलेली संपत्ती.ती संपत्ती काही एकट्या पतीनंच जमवली नव्हती.पण आता पत्नी अपंग होताच त्यानं दोन पत्नी केल्यानं तो ती संपत्ती त्यांच्यावर लुटवू लागला. पत्नीला आता विचार येत होता.तिची मुलं लहानशी होती.तो तिच्यावर अत्याचार करीत होता त्याच पत्नींसमोर.तिला मारतही होता.तिला बरोबर जेवायला खावायला देत नव्हता.नव्हे तर तिला दुषणेही लावत होता.
ती त्रस्त होती.ती अपंग असल्यानं पोलिसस्टेशनलाही जावू शकत नव्हती.नव्हे तर आपली कैफियतही कोणासमोर मांडू शकत नव्हती.ती हवं तर आपल्यावरील अत्याचार सहन करीत होती.
महत्वाचं सांगायचं म्हणजे नेमकं काय चुकतं स्रीयांचं अशावेळी.ते त्यांना समजत नाही.स्री कितीही चांगूलपणानं वागली तरी तिला नावबोटं ठेवणारे भरपूर असतात.शिवाय ल एखादी स्री जर सक्षम असेल तर तिच्या वाट्याला कोणी जात नाही.मग पती का असेना.पण हे पुरुषी रक्त वाट पाहात असतं त्या स्रीच्या अधु होण्याच्या संधीची.ती माता जरी असेल,तरी आमचा आजचा पुरुष हा आपल्याला तिनं नव महिने गर्भात ठेवलाय.आपल्याला जन्म दिलाय,उन्हातून सावलीत नेलाय.वाढवलाय.लहानाचं मोठा केलाय.एवढंच नाही तर शिकवलाय.हे विसरतो आणि आपल्या खुद्द मातेवरच अत्याचार करतो.तिला वृध्दाश्रमात टाकतो.जिथे तो आपल्या स्वतःच्या आईची काळजी घेवू शकत नाही.तिथे तर ती पत्नी.
श्रद्धालाही वाटत होतं की त्याचा बदला घ्यावा.त्याचा अत्याचार सहन करु नये.पण ती काय करणार.ती स्वपायानं चालू शकत नव्हती वा हातही हालवू शकत नव्हती.अगदी पुरुषी मानसिकतेपुढे लाचार होवून ते अत्याचाराचे जीर्ण जगणे जगत होती.एक अबला बनून………
अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०