अंकुश शिंगाडे नागपूर ९३७३३५९४५०
आज आपण संस्कार हरवत चाललोय असे म्हटल्यास आतिशयोक्ती होणार नाही.त्याचे कारणही तसेच आहे.विदेशी संस्कृती भारतात येवू लागलेली असल्याने आपणही बदलत आहोत नव्हे तर बदलत चाललेले आहोत.
पुर्वी आपण आपल्या बापाला दादा म्हणत होतो.तर आपल्या आजोबांना बाबा म्हणत होतो.आईला आई म्हणत होतो. त्यानंतर काळ बदलला.या बदलत्या काळानुसार आपण आपल्या आईला मम्मी म्हणायला लागलो.तर बापाला पप्पा.त्याचा अर्थ मुळात मम्मी म्हणजे मेलेल्या माणसाला टिकवून ठेवल्यावर तो जसा दिसतो तो भाग.त्याला थडगा म्हणता येवू शकेल.खरंच आमची आजची आई त्यासारखीच आहे.तिच्यात ममता जरी असली तरी ती ममता आज बरोबर दिसत नाही.कारण आमची आई आज मम्मी बनलेली आहे.
आज अाईच्या समोरच मुलगी जेव्हा अंगप्रदर्शन करत चालते.तेव्हा त्या आईसमोरच भक्षक तिच्या मुलीकडे निखारुन पाहात असतात.त्याचं आईला काहीच वाटत नाही.उलट ती आईही आपल्या मुलीच्या बरोबरीनं अंगप्रदर्शन करत असते.तिला आपल्या मुलीकडं असं कोणी निखारुन पाहिल्यास काहीच वाटत नाही.कारण त्या आईचा मम्मी झालाय हेच यातून सिद्ध होते.मात्र नेमके भक्षक तेच पाहात असतात.त्यांची वासनांध नजर तेच बघत असते.ते संधी शोधत असतात.तसेच संधी मिळतात ते आपल्या या सावजाला जाळ्यात ओढण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करतात.त्यासाठी आधी जवळीक साधतात.मग हळूहळू मदत करण्याचा प्रयत्न करणे.व्हाट्सअप आणि मेसेंजरवर बोलणे इत्यादी गोष्टी त्या भक्षकांच्या होत असतात.आपणही त्या अनोळखी माणसाची शहानिशा न करता त्याच्या गोड बोलण्यात फसतो व आपल्यावर स्वतः संकट ओढवून घेतो.
बरेचशी महिला मंडळी म्हणतात की आम्ही का अशा सावजाच्या धाकानं स्वातंत्र्य उपभोगू नये काय? बरोबर आहे त्यांचं म्हणणं.परंतू याचा अर्थ असा नाही की त्यांनी अशा सावजांशी जवळीक साधावी.आपण सावजाला बोटच आपला दिला नाही तर सावज आपला हात कसा पकडेल.पण आपला मम्मी आणि पप्पी बनलाय ना.दादा आणि बाबा आपल्यात उरलाच नाही ना.मग आपण बोटच नाही तर अख्खा हातच देतो.
आज ब-याच ठिकाणी बलत्काराची राजरोषपणे प्रकरण घडत आहेत.काही प्रकरणांचा अभ्यास केल्यास असंही दिसून येते की झालेल्या प्रकरणात एकमेकांची ओळख होती.त्यानं तिला शारीरिक सुखाची मागणी करताच तिनं नाही म्हटलं व तिनं नाही म्हणताच राग आल्यानं त्यानं दोनचार मित्रांना सोबत घेवून बलत्कार केला.असे होण्यापुर्वी जर अशी ओळखच त्या युवकाशी केली नसती तर बरं झालं असतं की नाही.पण इथं ऐकतो कोण?
आपल्या वडीलांना आपण आज पप्पा म्हणतो.पप्पाचा अर्थ कुत्र्याचं पिल्लू असा होतो.खरंच आजचा पप्पा हा कुत्र्याचेच पिल्लू बनला आहे.मम्मी नावाच्या मृत भावना नसलेल्या पुतळ्यानं मनात भावना पप्पांना गुलाम केलेलं दिसतं. आता मनात आणून जे म्हटलं ते तो पप्पी करतोय.तिनं म्हटलं तुझ्या आईला वृद्धाश्रमात टाक.पप्पी टाकणार.तिनं म्हटलं बापाला घराबाहेर हाकल.पप्पी हाकलणार.कारण पप्पी कुत्र्याचंच पिल्लू आहे ना.कुत्रा जसा घराची राखण करतो.मालकाचे आदेश पाळतो.मालकानं म्हटलं यावर भूंक तर तो भूंकतो.अशी त्याची अवस्था.
दादा म्हणजे संरक्षण करणारा.पुर्वी बापाला दादा म्हणत.तसा तो दादा संरक्षण करणारा असल्यानं तो दादा रुपात असलेला बाप दादागीरी दाखवत मुलांचं संरक्षणच करायचा.समाजातील अनैतिक घटकही त्याचं तो वडीलधारी असल्यानं अदबीनं वागत.ऐकतही असत.त्यामुळं असे बलत्कार नव्हतेच.पण आजचा बाप हा पप्पी असल्यानं तो आपल्या पोरांचं संरक्षण करीत नाही.तर तो अशा अनैतिक घटकांना सोडा,साधे पोराला काहीही बोलू शकत नाही.
आज दादा भावाला म्हटलं जातं.बरोबर आहे.कारण आजचा भाऊ आपल्या बहिणीचं संरक्षण करतो.परंतू हा भाऊ जेव्हा आपला दादेपणा खपविण्यासाठी अशा अनैतिक घटकाच्या संपर्कात येतो.तेव्हा तो भाऊ वयानं वडीलधारी वाटत नसल्यानं असे अनैतिक घटक त्याचं न ऐकता त्याचेवर चढाई करतात.यात शेवटी मुडदेही पडत असतात.
आजचा बाप मात्र आईच्या म्हणण्यानुसार चालतो.आई म्हणेल इथं बस तर बापालाही तिथंच बसावं लागतं.आज आजोबाचं आजेपण राहिलेलं नाही.संस्कार केव्हाचाच दूर गेलेला आहे.आज आजोबाला आजोबा न म्हणणारी पिढी.आज बाप व आईला वृद्धाश्रमात टाकणारी पिढी.ज्या मायबापाला वृद्धाश्रमात बिनधास्त विचार न करता टाकते.ती पिढी आजोबांची काय सेवा करणार? ही विचार करायला लावणारी बाब आहे.खरंच आज असं वाटायला लागलं आहे की आपण आज आपले संस्कार हरवत चाललोय.कारण आज आमच्या आईची मम्मी झाली आहे आणि बापाचा पप्पी(पप्पा) झाला आहे.म्हणूनच आज बलत्काराच्या संख्या वाढत चाललेल्या असाव्यात असे वाटते.
खरंच आज जे चित्र दिसत आहे.ते चित्र कुठेतरी बदलायला हवं.संस्कार रुजायला हवेत.आजोबाला आजोबा म्हणायलाच हवं.त्याची हेळसांड होवू नये.मायबापाला वृद्धाश्रमात जावू देवू नये.टाकूच नये.तसेच आईला आई व बापाला दादाच म्हणायला हवं.जेणेकरुन परीवार दिसेल अशा भरल्या परीवारावर कुणाची तिरपी नजर कधीच जाणार नाही.कारण तिथे संस्कार असतील.चांगले संस्कार……..