hacklink hack forum hacklink film izle hacklink lunchtime resultstürk ifşajojobetGrandpashabethepbet girisgrandpashabetjojobet
उस्मानाबाद  तुळजापूर

नगर परिषदेच्या निकालातून धडा; जिल्हा परिषदेसाठी ठाकरे गटाचा ‘सावध’ पवित्रा.

ठाकरे गटाचा आढावा दौरा; सक्षम उमेदवारालाच संधी देणार – आ. कैलास पाटील

तुळजापूर/प्रतिनिधी

नुकत्याच झालेल्या नगरपालिका निवडणुकीत ठाकरे गटाला पराभवला सामोरे जावे लागले आहे. तरी या पराभवाला सामोरे जातं, येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी सावध पवित्रा घेत ठाकरे गटाने तालुक्यामध्ये आढावा बैठका आयोजित केल्या आहेत.

शिवसेना जिल्हाप्रमुख तथा कळंब-धाराशिव चे लोकप्रिय आमदार श्री. कैलास घाडगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली या आढावा बैठकांचे आयोजन केलेले असून, धाराशिव चे सहसंपर्कप्रमुख श्री. मकरंद उर्फ नंदुभैय्या राजेनिंबाळकर, धाराशिव उपजिल्हाप्रमुख डॉ. जितेंद्र कानडे तसेच तुळजापूर चे युवा नेतृत्व, श्री. ऋषिकेश मगर यांची प्रमुख उपस्थिती या बैठकीस असणार आहे अशी माहिती शिवसेना ठाकरे गटाचे तालुकाप्रमुख श्री. जगन्नाथ गवळी-भोसले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

दि. 28 डिसेंबर रोजी तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा, जळकोट तसेच नंदगाव या जिल्हा परिषद गटांमध्ये हा दौरा नियोजीत असून सर्व शिवसैनिक बांधवांना उपस्थित राहण्याचे आवाहन सर्व शिवसैनिकांना तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी यांनी प्रसिद्धीपत्रिकाद्वारे केले आहे.

Related posts