उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी
सलमान मुल्ला कळंब
कळंब शहरातील नगरपालिका क्रमांक 1 चे सहशिक्षक अविनाश खरडकर हे कोरोना साथ आल्यापासून शासनाने वेळोवेळी दिलेल्या जबाबदारी पार पाडत आहेत. तसेच त्यांनी सध्या शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन शिक्षण देत आहेत
त्यांच्या या कार्याची दखल घेऊन कळंब तालुका पत्रकार संघाची बैठक जेष्ठ सदस्य माधवसिंग राजपुत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष परमेश्वर पालकर यांनी अविनाश खरडकर यांना पुरस्कार जाहीर केला. त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे.