उस्मानाबाद 

मौजे तेर येथील अभ्यासिका तात्काळ चालू करण्यात यावी ; शिवसेना तालुकाप्रमुख सतिशकुमार सोमाणी यांची मागणी.

साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले
विभागीय संपादक-मराठवाडा

मौजे तेर येथील अभ्यासिका तात्काळ चालू करण्यात यावी अशी मागणीशिवसेना तालुकाप्रमुख सतिशकुमार सोमाणी यांनी केली आहे.

मौजे तेर ता. जि. धाराशिव (उस्मानाबाद) येथे जनसुविधा अंतर्गत अभ्यासिकेचे काम मागील सहा महिन्यापूर्वी पूर्ण झाली असून सदरील अभ्यासिकेसाठी जनसुविधा निधीमधून तत्कालीन पालकमंत्री अर्जुन खोतकर साहेब लोकप्रिय खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार कैलास पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली काम पूर्ण झाले आहे.

तेर येथील विद्यार्थ्यांना व परिसरातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांना अत्यंत उपयोगी असल्यामुळे सदरील अभ्यासिका बांधण्यात आली आहे. कोविड 19 मुळे अद्याप अभ्यासिका चालू करण्यात आली नव्हती, परंतु गावातील काही लोक सदरील अभ्यासिका त्या ठिकाणाहून दुसरीकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. सदर ग्रामपंचायतची जुनी इमारत त्याठिकाणी मध्यवर्ती ठिकाण आहे व सदर अभ्यासिका फर्निचर हे त्याठिकाणी फिटिंग केलेले असल्याने तिथून काढणे अशक्य आहेत. जर ती काढण्याचा प्रयत्न केला तर दुसऱ्या ठिकाणी सदर फर्निचर उपयोगात येऊ शकत नसल्याने शासनाचा लाखो रुपये खर्च करून विद्यार्थ्यांसाठी बनवलेला हा एक सुंदर उपक्रम उद्ध्वस्त होऊन शासनाचे व विद्यार्थ्यांचे कधीही भरून न येणारे नुकसान होईल.

तरी सदरील अभ्यासिका स्थलांतर न करता तात्काळ लोकार्पण करावे हे गावकरी व विद्यार्थ्यांची आग्रहाची मागणी आहे.

दि. 24/02/2021 पर्यंत लोकार्पण नाही झाल्यास दि. 25/02/2021 ग्रामस्थांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे शिवसेना तालुकाप्रमुख सतीश कुमार सोमाणी यांनी दिला आहे.

Related posts