hacklink hack forum hacklink film izle hacklink lunchtime resultsGrandpashabetjojobetgrandpashabethepbet girisjojobet girişjojobetjojobetgrandpashabet
पंढरपूर

स्वेरीच्या तीन विद्यार्थ्यांची मल्टीनॅशनल कंपनीत निवड स्वेरी प्लेसमेंटमध्ये यंदाही अग्रेसर

सचिन झाडे –

पंढरपूरः- ‘पॅरामॅट्रिक्स, आय-इसेस आणि एनटीटी डेटा या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या तीन मल्टी नॅशनल कंपनीनी घेतलेल्या मुलाखतीत श्री विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयातील तीन विद्यार्थ्यांची कॅम्पस इंटरव्युवद्वारे निवड करण्यात आली आहे.’ अशी माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे यांनी दिली.
‘पॅरामॅट्रिक्स,आय-इसेस आणि एनटीटी डेटा’ या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या कंपन्यांच्या निवड समितीने गोपाळपूर येथील इंजिनिअरिंग कॉलेजमधील विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. त्यांनी या निवड प्रक्रियेच्या अंतिम फेरीतून ‘पॅरामॅट्रिक्स’ करीता अक्षय टोपगे, ‘आय-इसेस’ करीता आकाश सुरवसे आणि ‘एनटीटी डेटा’ करीता आरती गोडसे या तीन विद्यार्थ्यांची निवड केली. श्री विठ्ठल अभियांत्रिकीमध्ये विविध आंतरराष्ट्रीय कंपन्या येत असतात आणि पात्र विद्यार्थ्यांची निवड करत असतात. विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये स्वेरीचे विद्यार्थी आपले उत्तम करिअर घडवीत आहेत. कंपनीला कशा प्रकारचे विद्यार्थी हवे असतात? याचा सखोल अभ्यास करून ‘मागणी तसा पुरवठा’ या धोरणानुसार संबधित विद्यार्थ्यांना विशेष प्रशिक्षकांद्वारे प्रशिक्षण दिले जाते. स्वेरीमध्ये वार्षिक परीक्षेचा निकाल, संशोधने, मानांकने, इन्फ्रास्ट्रक्चर याबरोबरच विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून करिअरच्या दृष्टीने सर्वात महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या प्लेसमेंटकडे देखील अधिक लक्ष दिले जाते व मोठमोठ्या कंपन्यांना हवे तसे प्रशिक्षणार्थी विद्यार्थी घडविण्यासाठी प्रशिक्षित तज्ञांकडून उत्कृष्ठ मार्गदर्शन केले जाते. त्यामुळे प्लेसमेंट मध्ये देखील स्वेरीने आघाडी घेतली आहे. यामुळे अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळाल्यामुळे विशेषतः पालक वर्गात समाधानाची भावना निर्माण झाली आहे. सदर विद्यार्थ्यांना ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता प्रा. अविनाश मोटे यांच्यासह इतर प्राध्यापकांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले. संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ.बी.पी. रोंगे, संस्थेचे अध्यक्ष नामदेव कागदे, उपाध्यक्ष अशोक भोसले तसेच संस्थेचे पदाधिकारी व विश्वस्त, स्वेरी कॅम्पसचे इन्चार्ज प्रा. एम. एम. पवार, स्वेरी अंतर्गत असलेल्या इतर महाविद्यालयांचे प्राचार्य, अधिष्ठाता, विभागप्रमुख, प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह पालकांनी कॅम्पस इंटरव्ह्यूमधून निवड झालेल्या या तीनही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

Related posts