बहुजन शिक्षक महासंघाचा गुणवंत,पत्रकार,शिक्षक व कर्मचारी पुरस्कार वितरण सोहळा संपन्न
सोलापूर दि.-
पुरस्कार प्राप्त पत्रकार,शिक्षक व कर्मचारी यांना मिळालेला पुरस्कार हे त्यांचे एकट्याचे काम नसून त्या पाठीमागे त्यांचे आई-वडील,त्यांचा संपूर्ण परिवार यांनी केलेल्या त्यागामुळे पत्रकार,शिक्षक व कर्मचाऱ्यांना काम करण्यास बळ आणि वेळ मिळतो.त्यामुळे तुमच्यासाठी त्याग करणार्यांचाही सन्मान या संघटनेने केला आहे,असे महत्वपूर्ण विचार शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर यांनी मांडले.ते महाराष्ट्र राज्य बहुजन शिक्षक व कर्मचारी महासंघाच्या जिल्हास्तरीय गुणवंत पत्रकार,गुणवंत शिक्षक व गुणवंत कर्मचारी पुरस्कार वितरण करतेवेळी बोलत होते.अध्यक्षस्थानी महासंघाचे प्रदेशाध्यक्ष समाजभूषण अण्णासाहेब भालशंकर होते.
प्रारंभी राष्ट्रपुरुष यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलन करण्यात आले.त्यानंतर भारतीय संविधान उद्देशिकेचे सामुदायिक वाचन राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब डोळसे यांनी करुन घेतले.यावेळी अध्यक्षपदावरून बोलताना भालशंकर म्हणाले,”शिक्षकांचा सन्मान हाच आमचा स्वाभिमान आहे.आमचा स्वाभिमान डावलण्याचा प्रयत्न कोणीही करू नये.ते आम्ही सहन करणार नाही.माणसं उभा करणे हे आमचे कर्तव्य आहे.
यावेळी जिल्ह्यातील गुणवंत पत्रकार,गुणवंत शिक्षक आणि कर्मचार्यांचा सन्मान शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर,जिल्हा लेखाधिकारी दयानंद कोकरे,उत्तर सोलापूरचे गटशिक्षणाधिकारी बापूसाहेब जमादार,सुनील भोरे या मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
पाहुण्यांचा परिचय महासंघाचे राज्य सरचिटणीस बोधिप्रकाश गायकवाड यांनी करुन दिला.प्रास्ताविक जिल्हा सरचिटणीस रवी देवकर यांनी केले.सूत्रसंचालन संग्राम कांबळे व युवराज भोसले यांनी केले.यादीवाचन प्रा.डाॅ.राजदत्त रासोलगीकर यांनी केले तर प्राचार्य भास्कर बनसोडे यांनी सर्वांचे आभार मानले.
पुरस्कार वितरण करतेवेळी शिक्षणाधिकारी भास्करराव बाबर,गटशिक्षणाधिकारी उ.सोलापूर बापूसाहेब जमादार,लेखाधिकारी दयानंद कोकरे,महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अण्णासाहेब भालशंकर,राज्यसरचिटणीस बोधिप्रकाश गायकवाड यांच्या समवेत पुरस्कार प्राप्त शिक्षक व कर्मचारी
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रभाकर गायकवाड,विजयकुमार लोंढे,शामसुंदर गायकवाड,विनोद फडके,चंद्रमणी वाघमारे,सुभाष गायकवाड,सतिश पापा गायकवाड,अमोल निकाळजे,दाऊत आतार,धनाजी धिमधिमे,वीरभद्र स्वामी,प्रकाश साळवे,शिवाजी जगताप,प्रफुल्ल जानराव,अभिजीत वाळके,अनिलकुमार शिंदे,बाळासाहेब लोखंडे व सर्व तालुकाध्यक्षांनी परिश्रम घेतले.
यांचा झाला सन्मान:-
विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर गुणवंत पत्रकारिता पुरस्कार-
योगेश परशुराम कबाडे बातमीदार,दैनिक दिव्य मराठी सोलापूर,भरतकुमार मोरे-उपसंपादक-दैनिक पुण्यनगरी,सोलापूर.
क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले गुणवंत शिक्षक पुरस्कार-
प्रा.अभिजित भंडारे-सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील कनिष्ठ महाविद्यालय,मजरेवाडी,सोलापूर,प्राचार्य शंकर खळसोडे,न्यू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय,वडाळा,ता.उत्तर सोलापूर,गिरीष देवकते-जी.बी.घोडके विद्यालय,नान्नज,ता.उ.सोलापूर, जहांगीर तांबोळी,बॅ.बाबासाहेब भोसले प्रशाला,कासेगांव,ता.द.सोलापूर दत्तात्रय कसबे-माध्यमिक आश्रम प्रशाला लांबोटी,ता.मोहोळ,मनोजकुमार खडके जगदंबा विद्यालय पोखरापूर,ता.मोहोळ,चक्रधर पाटील,श्री.जगदंबा कमला भवानी मूकबधिर निवासी विद्यालय करमाळा,दत्तात्रय अवघडे-दि मॉडेल विविधांगी प्रशाला,माळीनगर, ता.माळशिरस,नवनाथ गायकवाड-श्रीमंतराव काळे विद्यालय जैनवाडी ,धोंडेवाडी ता. पंढरपूर,विठ्ठल एकमल्ली- श्री.बाळकृष्ण विद्यालय नंदेश्वर,ता.मंगळवेढा,जि.सोलापूर
क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले गुणवंत शिक्षिका पुरस्कार
सौ.सुनंदा बनसोडे -भैरवनाथ प्रशाला,केवड ता.माढा,सौ.सविता वाणी – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा,पिंपरी(साकत),ता.बार्शी,
राजर्षी शाहु महाराज गुणवंत कर्मचारी पुरस्कार
भीमसेन मिसाळ- सौ. हि.ने.न.शाह कन्या प्रशाला,बार्शी,ता.बार्शी,बसवेश्वर हंबीरराव – पांडुरंग विद्यालय कटफळ,ता.सांगोला,सोमनाथ मोटे-मतिमंद निवासी शाळा,कुर्डुवाडी,ता.माढा