साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले
विभागीय संपादक-मराठवाडा.
किलज (ता. तुळजापूर) – कोरोना सारख्या काळात एका देवदूतासमान डॉक्टर, पोलीस, यांचे कार्य हे उत्तम रीतीने आणि काळजीपूर्वक पार पडले आहे.
या मध्ये तुळजापूर तालुक्यातील किलज गावच्या सौ.सुनिता तानाजी मर्डे यांनीही पोलीस पाटील या पदाची जबाबदारी ही अत्यंत चांगल्या रीतीने पार पाडली असून त्यांना नळदुर्ग पोलीस स्टेशन अंतर्गत API राऊत यांच्या हस्ते कोरोना योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले.
मर्डे यांनी किलज गावासाठी कोरोना काळात केलेले कार्य हे उल्लेखनीय आहे . त्यांनी केलेल्या कार्याची दखल घेत हा सन्मानित पुरस्कार देण्यात आला.