26.8 C
Solapur
February 29, 2024
उस्मानाबाद  तुळजापूर

स्व. मंदाकिनी चौधरी यांच्या स्मृतीदिनानिमित्त बेवारस लोकांना ब्लॅंकेट वाटप.

साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले
विभागीय संपादक-मराठवाडा

तुळजापूर येथील स्व. मंदाकिनी राजेंद्र चौधरी यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या कन्या पत्रकार कु. किरण चौधरी यांच्या वतीने गोरगरीब काय करणार बेवारस ,अनाथ, गरजवंत, अशा लोकांना येथील जुन्या बसस्थानकामध्ये ब्लॅंकेट वाटप करण्यात आले.

समाजामधील दुर्बळ घटकाकडे दुर्लक्ष केले जाते सध्या थंडीचे दिवस चालू असून असे लोक बस स्टॅन्ड रस्त्याच्याकडेला थंडीमध्ये उघड्यावर झोपलेले असतात अशा लोकांना स्मृतिदिनाचे औचित्य साधून निमित्ताने चौधरी परिवाराच्या वतीने ब्रॅकेट वाटप करून त्यांनी समाजात एक आदर्श निर्माण करत कौतुकास्पद कार्य केल्याची चर्चा सर्वत्र होत आहे.

यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस गुलचंद व्यवहारे, भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमर परमेश्वर, राष्ट्रवादीचे नेते संदीप गंगणे, आप्पा पवार, शरद जगदाळे, सचिन कदम, भाजप मीडिया विभागाचे शहराध्यक्ष सागर कदम, मनसेचे युवक तालुकाध्यक्ष धर्मराज सावंत, सामाजिक कार्यकर्ते संजय बोंदर, पत्रकार श्रीकांत कदम, प्रदीप अमृतराव, सचिन ताकमोघे, कुमार नाईकवाडी, अनिल आगलावे, अमीर शेख, उमेश पोतदार, आशा वाघ आदींसह चौधरी परिवारातील प्रकाश चौधरी, मारुती चौधरी, राजेंद्र चौधरी, संजय चौधरी, लता चौधरी,महानंदा चौधरी, आदींची उपस्थिती होती

Related posts