30.7 C
Solapur
September 28, 2023
महाराष्ट्र

ग्रामसंवाद सरपंच असोसिएशनच्या राज्यव्यापी आंदोलनाला यश, पथदिवे देयके पुढील व थकीत विज बिल राज्यशासनच भरणार- कु.कोमल करपे

अशोक सोनकंटले
दक्षिण सोलापूर प्रतिनिधि

ग्रामसंवाद सरपंच असोसिएशन महाराष्ट्र राज्य चे प्रदेशाध्यक्ष आजिनाथ धामणे, उपाध्यक्ष प्रमोद भगत, सचिव विशाल लांडगे,महिला प्रदेश उपाध्यक्ष कोमल ताई करपे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष सतीश भुई, प.महाराष्ट्र संघटक भास्कर भोसले,सोलापूर जिल्हा अध्यक्ष सुनील राजमाने व इतर सर्व पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली महावितरण विरोधात सुरू केलेला लढा यामधील पहिल्या टप्प्याला यश आले आहे. राज्यातील ग्रामपंचायतींच्या पथदिव्यांची विज बील थकबाकी भरण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून मागील व येथून पुढील राज्यातील पथदिव्यांची थकबाकी व चालू बीले राज्य शासनामार्फत जिल्हा परिषदेला पाठविण्यात येणार व जिल्हा परिषदेकडून पंचायत समिती यांच्याकडे अनुदान पाठवून प्रति महिना ग्रामसेवक मार्फत मागील व चालू तसेच येथून पुढच्या काळातील वीजबिल देयके हे आता गटविकास अधिकारी यांना सादर करून राज्य शासन भरणार आहे , असे शासनाने नवीन परिपत्रक काढून विज बिल भरण्याकरता विशिष्ट फंड उपलब्ध करून दिला आहे . नक्कीच त्याचा फायदा महाराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतला होणार आहे ,ग्रामसंवाद सरपंच असोसिएशन ने सुरू केलेल्या महाराष्ट्र भर लढ्यातील पहिल्या टप्प्याला यश आले आणि असा शासन निर्णय आपल्या ग्राम विकास विभागाचे प्रधान सचिव यांनी काल निर्गमित केला असून राज्यातील बऱ्याच सरपंच यांनी पथदिव्यांची वीज कनेक्शन तोडू नये यासाठी वारंवार महाराष्ट्रभर ग्रामसंवाद सरपंच असोसिएशनच्या नेतृत्वा खाली आंदोलन केले त्या आंदोलनाला यश आले व सरकार ला जाग आली आणि ग्रामविकास विभागाने याबाबत शासन निर्णय निर्गमित करुन राज्यातील पथदिव्यांची वीज देयके भरणे बाबतचा निर्णय घेतला याबद्दल ग्रामविकास विभागाचे व ग्रामविकास मंत्री यांचे हार्दिक स्वागत करुच परंतु यानं नंतर काही निर्णय घेताना महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींना विश्वासात घेऊन निर्णय करावे आणि पथदिवे यांचे विज बिल सरकार भरत असले तरी महावितरण कडून कराची वसुली करून गावातील महसुली उत्पन्न वाढण्यास मदत होईल तसेच महावितरण कडे असलेली बाकी तात्काळ वसूल करावी अशाप्रकारे आम्ही लढा चालू ठेवून तसेच ग्रामविकासाचे हिताचा निर्णय घेण्याकरता शासनास सूचना देऊन ग्रामपंचाय च्या विकासाकरता एकत्र येऊन योग्य निर्णय घेण्यास भाग पाडू अशी माहिती महिला प्रदेश उपाध्यक्ष कु.कोमल अशोक करपे यांनी दिली.

Related posts