एसटी कर्मचाऱ्यांना संप मागे घेत कामावर रुजू होण्याचे आवाहन एसटी महामंडळाने केले होते. महामंडळाच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यातील काही आगारांमधील एसटी वाहतूक सुरू झाली आहे. तर, दुसरीकडे संपकऱ्या कर्मचाऱ्यांचा विरोध कायम आहे. अहमदनगर जिल्ह्यात शेवगाव आगाराच्या तीन एसटी बसेसवर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत एसटी बस चालक जखमी झाला आहे. या दगडफेकीच्या घटनेमुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
शेवगाव आगारातील एसटी कर्मचारी आणि आगारप्रमुख यांच्या चर्चा झाली. या चर्चेनंतर सर्व कर्मचारी कामावर रुजू झाले. अहमदनगर जिल्ह्यातील फक्त एकाच आगारातील संप मागे घेण्यात आला आहे. आज सकाळपासून शेवगाव आगारातील वाहतूक सुरू झाली. शेवगाव आगारातून पैठण, नगर शहर, श्रीरामपूरकडे जाणाऱ्या तीन एसटी बसवर अज्ञातांनी दगडफेक केली. शेवगाव-नगर बसवर अमरापूरजवळ बसच्या मागील बाजूस दगडफेक केली. यामध्ये बसची काच फुटली. चक. शेवगाव-श्रीरामपूर बसवर सौंदळा येथे दगडफेक झाली. शेवगाव-पैठण बसवर दहिफळ फाटा येथे दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत एसटी चालक नामदेख खंडागळे जखमी झाले आहेत. या दगडफेकीची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे.
दगडफेक करणारे अज्ञात कोण?