अक्कलकोट

अन्नछत्र मंडळाची श्री स्वामी समर्थ वाटिका भाविकांसाठी खुली

अक्कलकोट ( प्रतिनिधी ) –
श्रीक्षेत्र अक्कलकोटच्या वैभवात भर टाकणारे कार्ये श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ हे करीत आहे . कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली ८ महिने न्यास पूर्णपणे बंद होते. मात्र न्यासाकडून फुलविलेली ‘श्री स्वामी समर्थ वाटिका’ची देखभाल वेळोवेळी करीत आल्यानेच आजही नव्याने उभी केलेली वाटिका वाटत आहेत. आता पुनश्च: भक्तांच्या सेवेर्थ सुरु करण्यात आले आहे. भक्तांच्या सेवेर्थ सुरु करण्यात आलेल्या वाटिकेचे पूजन गरुवारचे औचित्य साधून न्यासाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली वाटिकेचे पूजन न्यासाचे सचिव शामकाका मोरे यांच्या हस्ते करुन करण्यात आले आहे.

सदर वाटिका ही आता दररोज दुपारी 5 ते रात्रो 9 पर्यंत असणा आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थर्मल चेकींग, सामाजिक अंतर, मास्क याबाबत कटाक्षाने पाहण्याकरिता विशेष सुरक्षा पथकाची नियुक्ती करण्यात आलेली आहे. वाटिका भाविकांसाठी खुली करण्यात आल्याने याचे स्वागत व समाधान व्यक्त केले जात आहे. यावेळी बाळासाहेब घाटगे, प्रसाद हुल्ले, सिध्देश्वर जाधव आदीजण उपस्थित होते.

Related posts