अक्कलकोट प्रतिनिधी
दुधनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे नूतन सभापती प्रथमेश म्हेत्रे यांचा पंचायत समिती सदस्य एडवोकेट आनंदराव सोनकांबळे यांच्या हस्ते गुरुवारी काँग्रेस कार्यालयात सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडी तालुकाध्यक्ष माया जाधव, नगरसेवक, डॉक्टर उदय म्हेत्रे, चिक्कीहळ्ळीचे ग्रामपंचायत नूतन सदस्य इरण्णा दसाडे ,काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष भीमाशंकर कापसे, उपाध्यक्ष बसवराज अळ्ळोळी, दुधनीचे आरपीआय नेते सैदप्पा झळकी आदींची प्रमुख उपस्थिती होती. दूधनी कृषी उत्पन्न बाजार समिती नूतन सभापती प्रथमेश म्हेत्रे यांचा शाल, फेटा बांधून ,पुष्पहार घालून आनंदराव सोनकांबळे यांनी सत्कार केला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी प्रथमेश म्हेत्रे यांचे अभिनंदन केले. आपण जनसेवेसाठी सदैव तत्पर राहू. कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून शेतकरी बांधवांच्या समस्या सोडविण्यासाठी कार्यरत राहणार .जनसेवेसाठी माझे आजोबा स्वर्गीय सातलिंगाप्पा म्हेत्रे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून कार्य करणार असे प्रतिपादन नूतन सभापती प्रथमेश म्हेत्रे यांनी सत्कार याप्रसंगी केले.
यावेळी नागेश कोळी, सोमनाथ दसाडे ,कैलास दसाडे, विजयकुमार दसाडे, दत्ता कांबळे, हनुमंत कांबळे, शिराज मुल्ला ,गोपाल लोहार, हसन शेख ,महादेव चुंगी, रणजित जाधव आदीसह पदाधिकारी , नागरिक उपस्थित होते.