साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले,
विभागीय संपादक – मराठवाडा.
तुळजापूर – दि. 27 फेब्रुवारी रोजी श्री. तुळजाभवानी सैनिकी माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालय तुळजापूर येथे संत रविदास यांची जयंती तसेच मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. महाराष्ट्र सरकारने संत रविदास महाराज यांची जयंती दरवर्षी साजरी करण्याचा निर्णय घेतला आहे.
जाती आणि लिंग यांच्यामधील सामाजिक भेदभाव हटविण्यास आणि वैयक्तिक आध्यात्मिक स्वातंत्र्य मिळवण्याच्या प्रयत्नात एकतेला प्रोत्साहन देणारे संत रविदास महाराज यांना आज श्री तुळजाभवानी सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. संत रविदास महाराजांच्या प्रतिमेचे पूजन विद्यालयाचे प्राचार्य श्री घोडके व्ही.बी. यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच मराठी राजभाषा दिनानिमित्त विद्यालयातील मराठी विषय शिक्षक श्री सुरवसे भीमा, डॉ. सुभाष पेटकर व श्री माने ज्ञानेश्वर यांचा विद्यालयाचे प्राचार्य श्री घोडके सर यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाला विद्यालयातील सर्व शिक्षक ,वसतिगृह अधिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.