hacklink hack forum hacklink film izle hacklink bahiscasinograndpashabethepbet giriscasibomjojobetjojobetHoliganbet
उस्मानाबाद 

भविष्य निर्वाह निधी चा विषय केंद्रीय स्तरावर असल्याने अधिवेशन काळात सोडवण्याचा प्रयत्न करू – खा. शरदचंद्र पवार साहेब.

साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले,
विभागीय संपादक-मराठवाडा.

तेरणा सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी आता हालचालींना खूप वेग आला असून जिल्ह्यातील अनेक नेत्यांनी हा कारखाना सुरू करण्यात यावा यासाठी सर्वस्व पणाला लावत शर्थीचे प्रयत्न सुरू केले आहेत. यासंदर्भात च राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी धाराशिव (उस्मानाबाद) चे खासदार ओमराजे निंबाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ.कैलास घाडगे-पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली आहे.

तेरणा सहकारी साखर कारखाना व तुळजाभवानी साखर कारखाना चालू करण्यासंदर्भात जिल्हा मध्यवर्ती बँकेने कारखाने भाडे तत्वावर देण्यासाठी प्रकिया केली होती. मात्र कामगारांच्या भविष्य निर्वाह निधी कार्यालयाची व्याजासह 10 कोटी रक्कम थकबाकी देय बाकी आहे. कामगारांची भविष्य निर्वाह निधीची रक्कम देय असल्याने संबंधित विभागाने दोन्ही कारखान्यांवर कायदेशीर कारवाई करून मा.उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे आदेश घेतले आहेत व त्यामुळे ही रक्कम देईपर्यंत कारखाने सुरु करणे शक्य नाही.

कारखाने चालू करण्यासाठी कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम देणे आवश्यक असल्याने आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या सिल्वर ओक निवासस्थानी उस्मानाबाद चे खासदार ओमराजे निंबाळकर, शिवसेना जिल्हाप्रमुख तथा आ.कैलास घाडगे-पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश (दाजी) बिराजदार यांनी भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. तसेच कामगारांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम बाबत मार्ग काढण्या संदर्भात आपण पुढाकार घ्यावा अशी विनंती केली.

सदरील विषय केंद्र सरकारचा असल्याने मा.पवार साहेबांनी संसदीय अधिवेशन 8 मार्च पासून चालू होत आहे. त्या काळामध्ये सदरील विषय मार्गी लावण्या संदर्भात आपण संबंधितांची बैठक आयोजित करून विषय मार्गी काढू असे म्हटले. तसेच तेरणा सहकारी साखर कारखाना व तुळजाभवानी साखर कारखान्यांच्या कर्जापोटी जिल्हा बँकेला शासकीय थकहमी चा प्रस्ताव राज्य सरकारकडे आला आहे. तो अर्थ विभागा कडे पाठवून त्यावर सकारात्मक विचार व्हावा. याबाबत राज्याचे सहकार मंत्री मा.ना.बाळासाहेब पाटील साहेब यांना फोन करून सूचना केल्या. मा.पवार साहेबांनी मी आपल्या सोबत आहे. असे आश्वासन दिले यावेळी दिले.

Related posts