24.2 C
Solapur
September 26, 2023
तुळजापूर

स्थानिक खासदार विकास निधी अंतर्गत विविध विकासकामांचे उद्घाटन व लोकार्पण साईनाथ गवळी

साईनाथ गवळी
उस्मानाबाद/तुळजापूर तालुका प्रतिनिधी,

चिलवडी (ता जि उस्मानाबाद (धाराशिव)) येथे स्थानिक खासदार विकास निधी अंतर्गत बोरवेल व पाण्याच्या टाकीचे लोकार्पण तसेच गाव अंतर्गत जनसुविधा व 2515 अंतर्गत राजेंद्र जाधव ते आकाश झुंजारे व बालाजी जाधव ते पंडित सुरवसे यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्त्याचे उद्घाटन धाराशिवचे लोकप्रिय खा. ओमराजे निंबाळकर व आ.कैलास घाडगे-पाटील तसेच गावातील प्रतिष्ठित व्यक्तींच्या हस्ते करण्यात आले.

याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख विजय बापू सस्ते, शिवसेना तालुकाप्रमुख सतिषकुमार सोमाणी, माजी पं.स. सभापती श्याम जाधव, माजी पं.स सदस्य नानासाहेब पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष बुबासाहेब जाधव, पं.स.सदस्य गजेंद्र जाधव, सरपंच अंकुश मोरे, उपतालुका प्रमुख अण्णासाहेब पवार, विभागप्रमुख सौदागर जगताप, पंकज पाटील, उदय पाटील, जुनोनी माजी सरपंच अमोल मुळे, शाखा अध्यक्ष ज्ञानेश्वर भोसले, प्रितम जाधव आदी गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

Related posts