24.2 C
Solapur
September 26, 2023
तुळजापूर

राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तुळजापूर तालुकाध्यक्ष पदी रोहित रत्नाकर चव्हाण यांची निवड नियुक्ती

साईनाथ जगन्नाथ गवळी,
तुळजापूर/उस्मानाबाद(धाराशिव)
प्रतिनिधी.

काल रोजी तुळजापूर च्या राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या नूतन पदाधिकाऱ्यांची नियुक्त्या करण्यात आल्या.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जेष्ठ नेते जिवनराव गोरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश (दाजी) बिराजदार, युवक जिल्हाध्यक्ष आदित्य भैय्या गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस जिल्हाध्यक्ष दुर्गेश साळुंके यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस तुळजापूर तालुकाध्यक्ष पदी रोहित रत्नाकर चव्हाण व तुळजापूर शहराध्यक्ष पदी आदित्य धनंजय शेटे यांची निवड करण्यात आली.

यावेळी ज्येष्ठ नेते दिलीप नाना मगर माजी नगराध्यक्ष गणेश मेंबर कदम युवक तालुकाध्यक्ष संदीप गंगणे व्यापार ऊधोग तालुकाध्यक्ष आप्पासाहेब पवार युवक जिल्हा सरचिटणीस शशी नवले नितिन रोचकरी गणेश नन्नवरे समर्थ पैलवान आण्णा भई क्षीरसागर तोफिक शेख विकास भोजने अनमोल शिंदे विजय बोधले सचिन माळगे रणजित पलंगे उपस्थितीत होते.

Related posts