पंढरपूर
येथील रेडिमेड कपड्यांचे प्रसिद्ध व्यापारी, सोहम कलेक्शनचे मालक दीपक विश्वनाथ हंकारे ( वय 49 ) यांचे गुरुवारी मध्यरात्री ह्दयविकाराच्या आजाराने निधन झाले.
त्यांच्या दुःखद निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त असून सतत हसमुख व बोलका स्वभाव असल्याने सर्व क्षेत्रांमध्ये दीपक यांनी आपली छाप पाडली होती.
मध्यरात्री श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांना एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचारापूर्वी त्यांची प्राणज्योत मालवली.
आज दुपारी एक वाजता त्यांच्यावर हिंदू स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. दीपक यांच्या पश्चात त्यांची पत्नी स्वाती, मुलगा चैतन्य, मुलगी आर्या आणि आईवडील होत. प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक संजय हंकारे यांचे ते कनिष्ठ बंधू होत.