महाराष्ट्र

नवोदय परीक्षेत विशेष प्राविन्य मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार

प्रतिनिधी:-सलमान मुल्ला कळंब शहराच्या गुणवत्तेच्या शिरपेचात भर घालणार्या नवोदय परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवणार्या सर्व विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन सत्कार करुन कौतुक करण्याचा उपक्रम नगरसेविका सौ.सरला अजय सरवदे यांनी घेतला आहे.याचाच भाग म्हणुन काल गांधी नगर येथील नगर परिषद शाळेतील कु.सुधांशु सचिन भांडे व वैष्णवी बोबडे..केंब्रीज शाळेतील तांदुळवाडी रोड आश्रमशाळेच्या पाठीमागे रहात असलेला प्रज्वल प्रमोद नरहिरे तसेच लता मंगेशकर शाळेतील शिवाजी नगर येथे रहात असलेला प्रणव गजानन पाटील या विद्यार्थ्यांच्या घरोघरी जाऊन विद्यार्थ्यांसह पालकांचा सत्कार केला.लता मंगेशकर शाळेतील आत्तापर्यंत 56 विद्यार्थी नवोदय धारक करणारे शिक्षक श्री.गजानन पाटील सर यांचा विशेष सत्कार केला व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.

हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य शिघ्रकवी प्रा. डाॕ.बाळकृष्ण भवर..निलेश आप्पा होनराव,,काकासाहेब मुंडे सर..दत्ता तनपूरे..उदयचंद्र खंडागळे..मुस्तान मिर्झा..ओंकार कुलकर्णी..खदीम सय्यद अॕड.दत्ता पवार यांनी केले..हा उपक्रम हाती घेतल्यामुळे सगळ्या पालकांनी कौतुक केले तसेच भविष्यात तुमच्या हातुन सत्कार होण्यासाठी मुलामध्ये उत्सुकता रहावी अशा पद्धतीने तुम्ही कार्य करत रहा असे श्री.गजानन पाटील सर यांनी सांगीतले..

Related posts