याबाबत सविस्तर माहिती अशी की 2020 मध्ये खरिपाची पेरणी करत असताना शेतकऱ्यांना निकृष्ट दर्जाचे सोयाबीन मिळाले असून शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे त्यामुळे त्यांच्यावर कर्जाचा मोठा डोंगर उभा आहे त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये प्रमाणे अनुदान द्यावे.बोगस बियाणे बनवणाऱ्या कंपन्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करावा
अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने करण्यात आली आहे या निवेदनावर जिल्हा उपाध्यक्ष दत्ता बोदर,तालुकाप्रमुख सागर बारकुल, तालुका सचिव गोपाळ घोगरे, तालुका उपाध्यक्ष रामेश्वर थोरात आदींच्या सह्या आहेत.