उस्मानाबाद 

संवाद मराठी लाईव्ह च्या उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी पदी राम जळकोटे.

साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले
विभागीय संपादक-मराठवाडा

उस्मानाबाद – संवाद मराठी live या प्रसार माध्यमाच्या उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी पदी युवा पत्रकार राम जळकोटे यांची निवड करण्यात आली आहे.

संवाद मराठी चे मुख्य संपादक पोटे यांच्या माध्यमातून ही झाली आहे.राम जळकोटे हे एक युवा पत्रकार असून तुळजापूर तालुक्यातील किलज सारख्या ग्रामीण भागातील हे युवा व्याख्याते तसेच पत्रकार म्हणून आपली कामगिरी बजावत आहेत.

तरुण भारत वृत्तपत्र मध्ये राम जळकोटे हे पत्रकार असून आता संवाद मराठी लाईव्ह साठी झालेल्या त्यांच्या निवडीचे सर्वत्र कौतुक केले जात आहेत.त्यांचे वृत्तांकन आणि बोलण्याची प्रभावी भाषाशैली ही सर्वाना आकर्षक ठरणारी आहे.

Related posts