पुरूषोत्तम विष्णु बेले / उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून भूम शहर व परिसरात कोरोणा 19 चे रूग्ण वाढत आहेत तरीसुद्धा लोक मास्क चे वापर करीत नाहीत त्यांमुळेच कोरोणा चा संसर्ग वाढलेला दिसत आहे .
जिल्ह्यातील कोरोणा रूग्णांची वाढती संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, रूग्णांना अक्षरशः बेड देखील उपलब्ध होत नाहीत अशा परिस्थितीत भूम येथील
R.M. ग्रुप ने कोरोणा पासून संरक्षण करण्यासाठी भूम शहरात हजारो मास्क वाटप करण्यात आले. R.M. ग्रुप हा स्थापना झाल्यापासुन त्यांनी आतापर्यंत बरेच उपक्रम हे सामाजिक राबिवलेले आहेत. त्यातील हा भाग म्हणून त्यांनी आज भूम शहर , पोलीस स्टेशनला , व्यापारी वर्ग , फळविक्रेते , भाजीपाला विक्रते यांना कोरोणा पासुन बचाव व्हावा व कोरोणा चा संसर्ग वाढु नये यासाठी मास्क चे वाटप करण्यात आले.
यावेळी R.M.ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष राजाभाऊ माने , नगरसेवक सुमित तेलगं , सामाजिक कार्यकर्ते मनोज शिंदे ( सर ) , अकाश साठे , शहनवाज पिरझादे , शैलेश साठे, अमोल सुरवसे व इतर ग्रुप चे सदस्य उपस्थित होते .