29.7 C
Solapur
September 29, 2023
kaustubh divegaonkar
उस्मानाबाद 

उस्मानाबाद : जिल्हाधिकारी यांच्याकडून स्थानिक सुटया जाहीर

साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले
विभागीय संपादक-मराठवाडा
उस्मानाबाद, येथील जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी 2021 या वर्षातील उस्मानाबाद जिल्हयातील स्थानिक सुटया या अधिसूचना जारी आहे.

यात दि.02 मार्च 2021 रोजी (मंगळवार) हजरत ख्यॉजा शमशोद्दीन गाजी दर्ग्याचा ऊरुस,दि.14 ऑक्टोंबर 2021 रोजी (गुरुवार) महानवमी, दि.02 नोव्हेंबर-2021 रोजी (मंगळवार) धनत्रयोदशी अशा स्थानिक सुट्टया जाहीर केल्या आहेत.जिल्हयातील सर्व राज्य शासकीय कार्यलये, जिल्हा परिषद अंतर्गत कार्यालये, नगर पालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांचे कार्यालये,कोषागार कार्यालय व इतर शैक्षणिक संस्था यांना या सुटया लागू राहतील.

ही अधिसूचना उस्मानाबाद जिल्हयातील दिवाणी आणि फौजदारी न्यायालयांना व केंद्र शासनांच्या कार्यालयांना व बँकांना लागू राहणार नाही.

Related posts