साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले,
विभागीय संपादक – मराठवाडा.
तुळजापूर – काक्रंबा ता. तुळजापूर येथील महात्मा फुले ब्रिगेड चे उस्मानाबाद जिल्हा उपाध्यक्ष श्री. हरिदास वाघमारे यांनी कोरोनातून मुक्त होताच सहकुटूंब वृक्षारोपण करत समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
तुळजापूर तालुक्यातील काक्रंबा येथील लोकप्रिय युवा नेते तथा महात्मा फुले ब्रिगेडचे उस्मानाबाद जिल्हा उपाध्यक्ष श्री.हरिदास दशरथ वाघमारे हे कोरोना पॉझिटिव्ह आले होते. रुग्णालयात उपचार घेऊन बरे होताच त्यांनी रुग्णालयातुन बाहेर आल्यावर एक सामाजिक उपक्रम राबविला. सध्या रुग्णांना कमतरता भासत असलेल्या ऑक्सिजन चे महत्त्व लक्षात घेता रुग्णालयातुन बाहेर येताच त्यांनी आपल्या संपूर्ण परिवारासह वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन केले. अशा प्रकारचा स्तुत्य उपक्रम राबवत त्यांनी समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.
त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाबाबत सर्वत्र कौतुक होत आहे. या उपक्रमात हरिदास वाघमारे यांच्यासह त्यांच्या परिवारातील दशरथ वाघमारे, अमोल वाघमारे, स्वराज वाघमारे, मयुरी वाघमारे, द्रोपती वाघमारे, शुभारंभ वाघमारे, लक्ष्मी शिंदे, गणेश शिंदे आदि कुटुंबातील सदस्यांनी सहभाग नोंदवला.