पंढरपूर :
देशभरासह राज्यात मार्च पासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेकांच्या जीवितास धोका निर्माण झाला होता. यादरम्यान आपला जीव धोक्यात घालून कोरोना बाधित रुग्णांची सेवा करणाऱ्या पंढरपूर येथील कोरोना योद्ध्यांचा सन्मान वाखरी येथे हरिपूजा रेसिडेन्सी येथील नागरिकांच्या वतीने करण्यात आला.
यावेळी पंढरपूर नागरपरिषदेच्या विद्यमान नगराध्यक्षा मा.सौ.साधनाताई भोसले यांच्या अध्यक्षतेखाली व मा. उपनगराध्यक्ष मा.श्री. नागेश काका भोसले व वाखरीचे ग्रा.सदस्य व श्री.गायकवाड ज्ञानेश्वर फौंडेशनचे मा.श्री. संग्राम गायकवाड,लक्ष्मण गायकवाड यांच्या हस्ते पार पडला.
सदर कार्यक्रमात, कोरोना काळात कोरोना या विषाणूशी दोन हात करण्यासाठी हरिपूजा रेसिडेन्सी मध्ये रहिवाशी असलेले डॉ.विकास जाधव व त्यांच्या पत्नी डॉ. सौ जाधव . आरोग्य सेविका मुलाणी मॅडम,निकम मॅडम,कुलकर्णी मॅडम ,पोरे मॅडम ,खाडे साहेब (पोलीस),रणदिवे साहेब(पोलीस),दिलीप उघाडे साहेब (कृषी.ओम ऍग्रो),अजीम शेख,अजित नागणे(R P F),बनसोडे सर (लॅब टॅकांनोलॉजिस्ट) नाना पोरे(ग्रामपंचायत कर्मचारी),दराडे साहेब(नगरपालिका कर्मचारी),भिंगारे भाऊसाहेब(तलाठी), ओंबसे सर,पठाण सर, नांगरे सर,बुधवंत सर या कोरोना योध्याचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या,त्याच बरोबर मा.श्री.तानाजी लटके यांना LIC मध्ये M D R T झाल्याबद्दल त्याचाही सन्मान करण्यात आला.
यावेळी हरिपूजा रेसिडेन्सीचे अध्यक्ष देशमुख सर यांनी समस्या मांडून नाना_नानी पार्क विषयी माहिती सांगितली, नाना – नानी पार्कसाठी नागेश काका भोसले यांनी स्वखर्चाने बोर पाडून देणार असल्याचे व सर्व समस्या सोडविणार असल्याचे सांगितले व श्री.गायकवाड ज्ञानेश्वर फौंडेशनच्या वतीने फळाची झाडे व दीपावलीच्या निमित्ताने फराळाचे वाटप मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी रेसिडेन्सीतील सर्व पुरुष व महिला बहुसंख्य उपस्थित होत्या, हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी उगाडे साहेब,अमित पवार, विकी भोसले,बेळगावकर साहेब व सर्व सदस्य यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे प्रस्थाविक तानाजी लटके यांनी केले,सूत्रसंचालन राजेंद्र डोंगरे सर तर आभार तांदळे सर यांनी मांडले .