उस्मानाबाद 

उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालय म्हणजे भ्रष्टाचाराचा अड्डा

प्रतिनिधी-सलमान मुल्ला
उस्मानाबाद इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजना , बळीराजा चेतना अभियान यासारख्या अनेक प्रकरणात कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाला असून उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालय भ्रष्टाचाराचा अड्डा झाला आहे,  जिल्हाधिकाऱ्यांनी नियमबाह्य पद्धतीने प्रशासकीय मान्यता दिल्यामुळे या घोटाळ्याची गुंतागुंत वाढत गेल्याचा आरोप करत जिल्हाधिकारी श्रीमती दीपा मुधोळ मुंडे यांना सक्तीच्या रजेवर पाठवावे या संपूर्ण प्रकरणाची सक्तवसुली संचालनालय या मार्फत चौकशी करावी आणि दोषींवर भ्रष्टाचार तसेच  ॲट्रॉसिटी  कायद्यान्वये गुन्हे नोंद करावेत अशी मागणी प्रदेश सरचिटणीस सुजितसिंह ठाकूर यांनी आज उस्मानाबाद येथे पत्रकार परिषदेत केली.


      उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत नगर विकास विभागाकडून झालेल्या लोकशाहीर आण्णाभाऊ साठे नगर वस्ती सुधारणा योजनेच्या कामात 9 कोटी 35 लाख रुपयांचा अपहार झाल्याची तक्रार आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी विभागीय आयुक्तांकडे केली होती त्यावर विभागीय आयुक्तांनी नेमलेल्या चौकशी समितीने या प्रकरणात शासनाच्या नियमांचे  पायमल्ली करून खरेदीच्या वस्तू पूर्ण प्राप्त न करून घेताच पुरवठादारास रक्कमअदा  करण्यात आली , शासनाचे आर्थिक नुकसान आणि अनियमितता याला जबाबदार असणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्याची शिफारस केलेली असतानाही अद्याप का कारवाई केली जात नाही? असा सवालही आमदार सुजित ठाकूर यांनी यावेळी उपस्थित केला. या सर्व प्रकरणाचा संविधानिक आयुधांचा वापर करून विधिमंडळात आणि विधिमंडळात बाहेर पाठपुरावा करणार असून दोषींना कारवाई करण्यास भाग पाडणार असल्याच ही आमदार सुजितसिंह ठाकूर यावेळी म्हणाले.

Related posts