श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान, वडाळा संचलित व महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत लोकमंगल कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयद्वारे आयोजित “गांडूळ खत निर्मिती व व्यवस्थापन” या विषयावर आधारित ऑनलाइन शेतकरी मेळावा दि. ०३/१०/२०२० रोजी सायंकाळी ७.०० ते ८.३० या वेळेत यशस्वीरीत्या संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून समर्थ कृषि महाविद्यालय, देवूळगावराजा येथील किटकशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक व गांडूळ खत निर्मितीमधील अभ्यासक श्री. विलास चव्हाण उपस्थित होते.
सहभागी शेतकरी, विद्यार्थी व शिक्षकांना मार्गदर्शन करताना त्यांनी गांडूळ खत काळाची गरज का बनले आहे?, गांडूळ खत म्हणजे नेमके काय?, गांडूळाच्या विविध प्रजाती, गांडूळ खतामधील अन्नद्रव्यांचे प्रमाण, गांडूळांचा जीवनक्रम, गांडूळ खत बनविण्याच्या पद्धती- त्यामध्ये ढीग पद्धत, खड्डा पद्धत, विटांचे हौद पद्धत व सध्याच्या काळातील सर्वसामान्य शेतकर्यांडना परवडेल आणि घरच्या घरी गांडूळ खत बनविण्यासाठी उपयुक्त ठरणारी प्लॅस्टिक बेड पद्धत सोप्या भाषेमध्ये समजावून सांगितली. प्लॅस्टिक बेड पद्धतीतून मिळणारे फायदे, बेड उभारणीचे मोजमाप व त्यासाठी येणारा खर्च व त्याचे व्यवस्थापन याबाबत सविस्तरपणे मार्गदर्शन केले. गांडूळ खतासोबतच तयार होणार्यात व्हर्मीवाश निर्मितीची पद्धत व त्याच्या वापरामुळे होणारे पिकावरील परिणाम याचेही महत्व या ठिकाणी त्यांनी विशद केले व शेवटी शेतकरी बांधवांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरेही दिली. एकूणच या कार्यशाळेमध्ये महाराष्ट्रातून सहभागी झालेल्या जवळपास १३० शेतकरी, शिक्षक व विद्यार्थी यांनी मिळालेल्या माहितीबाबत समाधान व्यक्त केले व या कार्यशाळेमधून त्यांना गांडूळ खत निर्मिती व व्यवस्थापनाबाबत सखोल माहिती मिळाल्याचे नमूद केले. एकूणच सेंद्रिय शेतीस चालना देण्यासाठी गांडूळ खताचे महत्व वाढवणे, शेतकर्यांमच्या उतापडण खर्चात बचत करणे, रासायनिक खतांचा वापर कमी करणे, गांडूळ खत उत्पादनाकडे शेतकर्यां चा कल वाढवणे व त्यासोबतच जमिनीचा पोत सुधारणे ही उद्दिष्टे समोर ठेऊनच या ऑनलाइन शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते असे कार्यक्रमाचे अध्यक्ष व लोकमंगल कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रणजित पाटील यांनी नमूद केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. केतकी धाडवे, प्रास्ताविक प्रा. प्रविण शेळके व आभार प्रदर्शन प्रा. संगमेश्वर केदार यांनी केले. या कार्यक्रमाचे आयोजन गूगल मिट या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर करण्यात आले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी यांनी सहकार्य केले.