विदर्भ कोकण ग्रामीण बँक जेऊर शाखे तील खातेदार श्री मारुती ईश्वर तोरमल हे आजारपणाने मयत झाले. त्यांनी विदर्भ कोकण ग्रामीण बँ केचे बँक सहायक गणेश शिंदे यांच्या कडे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना रू 330 भरून उतरवला होता . या घटनेची माहिती मिळताच बँकेने आवश्यक कागदपत्रे घेऊन त्यांची विमाची रक्कम रू 200000 वारसदार त्यांची पत्नी कौसल्या मारुती तोर मल यांचा खात्यावर जमा झाले. त्याचे रकमेचे दस्त बँक शाखाधिकारी प्रवीण जोशी , कॅशियर पठाण, बँक कर्मचारी विजय माने , गणेश शिंदे, श्रीकृष्ण कोठावळे, याच्या हस्ते ईश्वर तोरमल उपस्थित देण्यात आला , तशेच शाखाधिकारी प्रवीण जोशी यांनी सर्व बँक खातेदारांना प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना फक्त 330 रू विमा 2 लाख, प्रधानमंत्री सुरक्षा विमा फक्त 12 रू विमा 2 लाख , तसेच अटल पेन्शन योजना सहभागी व्हा असे आवाहन केले आहे.

previous post