लोकमंगल कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालय वडाळा यांच्या राष्ट्रीय सेवा योजना एककाच्या विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या निरोप समारोप प्रसंगी अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रणजीत पाटील होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन आणि गांधीजींच्या प्रतिमा वंदनाने झाली.त्यानंतर शिबिरातील विविध उपक्रमांची माहिती श्रीराम कुलकर्णी यांनी दिली. त्या नंतर सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते. यामध्ये सर्व राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक व स्वयंसेविका यांनी उस्फूर्तपणे सहभाग घेऊन अतिशय उत्साहात सांस्कृतिक कार्यक्रम पार पाडला. आपल्या अध्यक्षीय मनोगतात डॉ. रणजीत पाटील यांनी स्वयंसेवकांचे कौतुक करून असेच समाज उपयोगी कार्य करत सजग आणि सक्षम नागरिक बनवून देशसेवा करण्याचा प्रयत्न करावा असे प्रतिपादन केले.अष्टपैलू जबाबदार व नीतिमूल्याने परिपूर्ण असे नागरिक या शिबिरातून घडतात असे सांगितले. या कार्यक्रमास लोकमंगल कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाचे प्रा. डॉ. रणजीत पाटील, कार्यक्रम अधिकारी प्रा.ज्योती गायकवाड तसेच महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व प्राध्यापिका तसेच राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक व स्वयंसेविका उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्रीराम कुलकर्णी यांनी केले तर ज्योती गायकवाड यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.