उस्मानाबाद  तुळजापूर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंतीनिमित्त युगप्रवर्तक बहुद्देशीय सामाजिक फाउंडेशन तर्फे गरजू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा पुस्तकांचे वाटप.

उस्मानाबाद जिल्हा प्रतिनिधी/ पुरुषोत्‍तम बेले

तालुका तुळजापूर युगप्रवर्तक बहुतेक सामाजिक फाउंडेशन उस्मानाबाद ,तुळजापूर कार्यकारणी मंडळ तर्फे स्पर्धा परीक्षा पुस्तकांचे विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. माणसाला माणूस म्हणून जगवणाऱ्या महामानव, क्रांतीसुर्य ,दलितांचा कैवारी ज्यांनी गुलामगिरी नष्ट करून जातीमधील रूढी -परंपरा समूळ नष्ट करून प्रत्येक व्यक्तीला, समाजाला ,न्याय मिळवून दिला .तसे भारतीय घटनेचे ,शिल्पकार, परम पूज्य ,बोधिसत्व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंतीनिमित्त तुळजापूर आंबेडकर चौक या ठिकाणी गरजू व आर्थिक विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप करण्यात आले, ज्या समाजाचे आपण देणं आहोत त्या समाजासाठी काहीतरी केलं पाहिजे, डॉ. बाबासाहेबांनी शिका, संघटित व्हा ,संघर्ष करा हा संदेश देऊन समाजाला संबोधित केले आहे.

बाबासाहेबांनी दलितांना नव्हे तर समाजातील प्रत्येक घटकाला ,समाजाला, नागरिकाला माणसात आणले हा समाज असंख्य लोकांच्या रक्तावर पोसलेला आहे हे लक्षात येत गेले, शोषित ,पीडित समाज हा उच्चशिक्षित झाला पाहिजे, असे बाबासाहेबांचे मत होते. गावकुसाबाहेर राहणारा समाज माणसात आला, माणसाला माणसाला माणूस पण घेऊन स्वतःची वेगळी ओळख निर्माण करून दिली. युगप्रवर्तक बहुउद्देशीय सामाजिक फाउंडेशन कार्यकारी मंडळ तुळजापूर आंबेडकर चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त गुणवंत व गरजू ,आर्थिक मदत तुळजापूर मध्ये पुस्तक वाटप करण्यात आले व प्रशस्त हॉल यांची सुविधा केली जाणार आहे.

युगप्रवर्तक बहुउद्देशीय सामाजिक फाउंडेशनचे- अध्यक्ष सतीश ढोणे सर, उपाध्यक्ष त्रिशला गवळी मॅडम ,सचिव सिद्राम साखरे साहेब ,कार्यकारी संचालक मंडळ व सर्व सन्माननीय शिक्षक ,फाउंडर -तुळजापूर युगप्रवर्तक सर्व सदस्य, ज्ञानार्थी अकॅडमीचे संचालक किशोर भगत सर उस्मानाबाद ज्ञानदीप स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र चे संचालक राहुल वाघमारे सर पत्रकार लखन वाघमारे विद्यार्थी- पृथ्वीराज परकाळे,गौतम मेंढे, वर्षा खारवे,योगिता मेंढे
प्रमुख पाहुणे -अध्यक्ष नाना शितोळे साहेब ,वंचित बहुजन आघाडीचे प्रवक्त नेते मिलिंद दादा रोकडे ,यशवंतराव चव्हाण महाविद्यालय प्राध्यापक गायकवाड सर, ॲडव्होकेट ढवळे साहेब, यांनी उपस्थित राहून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त युगप्रवर्तक बहुउद्देशीय सामाजिक फाउंडेशन यांच्या विद्यमाने हा कार्यक्रम संपन्न करण्यात आला.

Related posts