26.8 C
Solapur
February 29, 2024
पंढरपूर

पंढरीत रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस उद्योग व व्यापार सेलच्या वतीने राष्ट्रवादी परिवार संवाद चे आयोजन – नागेश फाटे,(प्रदेशाध्यक्ष)

दैनिक राजस्व
सचिन झाडे –

पंढरपूर/प्रतिनिधी 
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार यांच्या 81 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेसचे उद्योग व व्यापार सेलचे प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांनी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी परिवार संवाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम उद्या शनिवार दि.12 डिसेंम्बर रोजी सकाळी 9 वाजता पंढरपूर येथे पंढरपूर -महूद रस्त्यावर असलेल्या श्रेयस पॅलेस येथेआयोजित करण्यात आला आहे.

या राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रमासाठी सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. दत्तात्रय भरणे, जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे, प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार दीपक साळुंखे, राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील,सोलापूर जिल्याचे नेते आणि सहकार शिरोमनीचे चेअरमन कल्याणराव काळे, विट्ठलचे चेअरमन भगीरथ भालके, सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी युवकचे अध्यक्ष गणेश पाटील, जिल्हा उपाध्यक्ष युवराज पाटील, पंढरपूर शहराध्यक्ष सुधीर भोसले, तालुकाध्यक्ष विजयसिंह देशमुख,, महिला आघाडी शहराध्यक्ष संगीता माने, तालुकाध्यक्ष राजश्री ताड, आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

या राष्ट्रवादी परिवार संवाद कार्यक्रम वेळी प्रमुख वक्ते म्हणून राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक लतीफभाई तांबोळी, आणि सुधाकर कवडे  मार्गदर्शन करणार आहेत. तरी या कार्यक्रमासाठी वरील वेळी, वरील ठिकाणी वेळेवर सर्व राष्ट्रवादी काँगेसचे सर्व सेलच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहनही प्रदेशाध्यक्ष नागेश फाटे यांनी केले आहे.

Related posts