साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले
विभागीय संपादक – मराठवाडा.
उस्मानाबाद – कृषी महाविद्यालय आळणी (गडपाटी) येथे भारताचे पाचवे माजी पंतप्रधान आणि शेतकरी नेते चौधरी चरणसिंह यांची जयंती आणि राष्ट्रीय शेतकरी दिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. क्रांतीकुमार पाटील यांनी भूषवले. मान्यवरांच्या हस्ते प्रतिमापूजन करून मा. श्री चौधरी चरण सिंह यांना आदरांजली वाहण्यात आली. यानंतर महाविद्यालयाचे विस्तार शिक्षण विभागाचे प्राध्यापक कालिदास बंडे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, ते म्हणाले की “शेतकरी पुत्र म्हणून व कृषी निगडीत विद्यार्थी म्हणून विद्यार्थ्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाचे धडे गिरवताना ते तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी कृषिदूत म्हणून काम करणे गरजेचे आहे. आपण भारतातील सर्वात मोठ्या व्यवसायिक क्षेत्राचे घटक आहोत याचा आपणास सार्थ अभिमान वाटला पाहिजे”. ते पुढे म्हणाले की, जोपर्यंत आपण कृषी क्षेत्राकडे व्यावसायिक दृष्टिकोनातून बघणार नाही व शेतकरी पुत्र म्हणून उत्पादन व विपणन क्षेत्रामध्ये योगदान देणार नाही, तोपर्यंत कृषी क्षेत्रात मरमर राबणा-या शेतकऱ्यांऐवजी दलाली किंवा मध्यस्थी करून विक्री करणारा व्यापारी वर्ग आपली पोळी भाजून घेईल.
कृषी कीटकशास्त्र विभाग प्रमुख प्रा. गुरव पि.के. आपल्या मार्गदर्शनातून म्हणाले की शेतकरी दिन केवळ समाज माध्यमांत स्टेटस ठेवण्यापुरता न साजरा करता शेतकरी विकासासाठी एक चळवळ उभी राहिली पाहिजे. त्यांनी विद्यार्थ्यांना शेती व्यवसायातील व्यथा व परिश्रम यावर सविस्तर मार्गदर्शन केले व शेती विषयक कवितांच्या माध्यमातून शेती विषयक प्रोत्साहन केले. कार्यक्रमाचे समालोचक श्री सुतार यांनी बाजारभाव शेतीकडे कल वाढण्याची गरज व्यक्त केली आपल्या वक्तव्यात ते म्हणाले की “डोक्यात व शेतात काय पिकते या ऐवजी बाजारात काय विकते याचा अंदाज आता बांधण्याची गरज आहे, आणि काय विकेलं हे ठरवताना कसे विकता येईल याचाही विचार करावा लागेल. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर क्रांती कुमार पाटील आपल्या अध्यक्षीय समारोपात म्हणाले की चौधरी चरण सिंह यांचे योगदान कृषी क्षेत्रात खूप मोठी आहे; संसदेत शेतकरी आवाज उठवणारे बुलंद तोफ अशी त्यांची ओळख होती, विद्यार्थ्यांनी त्यांचा आदर्श ठेवत आपल्या प्रश्नांना वाचा फोडली पाहिजे.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सुतार एन. एस. यांनी केले तर महाविद्यालयातील विद्यार्थी सुमित गंगथडे व अच्युत गिरी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद प्राध्यापक फडतरे प्रा. सचिन खताळ, प्रा. शेटे डी.एस. प्रा. भालेकर एस. व्ही., प्रा. बुरगुटे के. ए., प्रा. गायकवाड पि. ए., प्रा पवार ए.डी., प्रा. गार्डी ए. जि. प्रा. साठे एम. पी प्रा. जगधाने एस. एम. प्रा. नागरगोजे व्ही. टी. , प्रा. दळवी सतीश व प्राध्यापिका पाटील एस एन, प्राध्यापिका साबळे एस. एन, प्राध्यापिका वाकळे ए जी प्राध्यापिका आर.एस. पठाण इतर कर्मचारी महाविद्यालय व्यवस्थापक प्रा. हरी घाडगे, सुतार रामचंद्र, गुलाब मुजावर, गावठे दत्तात्रय व विद्यार्थी यांनी अथक परिश्रम घेतले.