श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचालित व महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्नित लोकमंगल कृषी व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयातील ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत दि:- 28 जुलै २०२२ रोजी विद्यार्थ्यांनी E-Peek ऍप द्वारे नोंदणी कशी करावी या बाबतीत मोजे- कामती बु. ता- मोहोळ जि- सोलापूर येथे शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली.
ई-पीक पाहणीचे फायदे :-
शेतकऱ्यांना देय असणाऱ्या कोणत्याही योजनेच्या थेट लाभासाठी ई-पीक पाहणी प्रकल्पातील माहिती अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.गाव, तालुका, जिल्हा आणि विभाग निहाय पिकाखालील क्षेत्राची अचूक आकडेवारी सहज उपलब्ध होणार आहे.ठिबक आणि तुषार सिंचन योजनेसारख्या योजनांचा लाभ खातेधारकांना अचूकरित्या देणे शक्य होणार आहे.खातेनिहाय आणि पीकनिहाय क्षेत्राची यादी उपलब्ध होत असल्याने शेतकऱ्याकडून देय ठरणारा रोजगार हमी उपकर आणि शिक्षण कर निश्चित करता येईल.खातेदारनिहाय पीक पाहणीमुळे खातेदार निहाय पीक कर्ज देणे, पीक विमा भरणे किंवा पीक नुकसान भारपाई शक्य होणार आहे.कृषि गणना अत्यंत सुलभ पद्धतीने व अचूकरित्या करता येईल.
ई-पिक पहाणी तपासणीचे टप्पे आणि कालावधी:-
ई-पीक पाहणी अंतर्गत खातेदाराची एकदाच नोंदणी करण्यात येईल.15 सप्टेंबरपर्यंत हंगाम निहाय पिकाची माहिती अक्षांश-रेखांशासह काढलेल्या पिकाच्या छायाचित्रासह अपलोड करण्यात येईल.16 ते 30 सप्टेंबर दरम्यान मोबाईल ॲपमधील माहितीची अचूकता पडताळून आणि आवश्यक असल्यास दुरूस्ती करून तलाठी ती कायम करतील.खातेनिहाय पिकांची माहिती संबंधित डिजिटल स्वाक्षरीत 7/12 मधील गाव नमुना नंबर 12 मध्ये उपलब्ध करून देण्यात येईल.1 ऑक्टोबरपासून शेतकरी रब्बी हंगामाची पीक पाहणी अपलोड करू शकतात.
एका मोबाईलवरून 20 खातेदारांची नोंदणी करता येणार असल्याने एखाद्या शेतकऱ्याकडे स्वत:चा स्मार्टफोन नसल्यास उपलब्ध होणारा दुसरा र्स्माटफोन वापरता येईल.अल्पवयीन खातेदाराच्या बाबतीत त्याचे पालक नोंदणी करू शकतात. सामायिक खातेदार त्यांच्या वहीवाटीत असलेल्या क्षेत्रातील पिकांची स्वतंत्रपणे नोंदणी करू शकतील.
हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ. रणजित पाटील सर, कृषि कार्यानुभव चे समन्वयक :- डॉ. एम. बनसोडे मॅडम, व प्राध्यापक प्रविण शेळके व नवनाथ गोसावी सर, यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
कृषिदुत- वैष्णवी गव्हाणे,काजल भोसले,नेहा थोरात,ज्ञानेश्वरी गायकवाड,आदिती सोनवने,गायत्री गोसावी,ऋतुजा सलगर आदी उपस्थित होते*