तुळजापूर

खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी हंगरगा (तूळ), येथे पावसामुळे झालेल्या नुकसानाची केली पाहणी

साईनाथ गवळी,
तुळजापूर/उस्मानाबाद प्रतिनिधी.

हंगरगा (तूळ), येथे मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या घरांची व शेतींची पाहणी आज धाराशिव जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी पाहणी करून तहसीलदार सौदागर तांदळे साहेब यांना तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिले. यावेळी गावकर्‍यांनी खासदार साहेबांना गाव पुनर्वसन करण्यासाठी साकडे घातले. यावेळी खासदार साहेबांनी बोलताना हंगरगा (तूळ) पुनर्वसनाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावू असे गावकर्‍यांना आश्वासन दिले.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख जगन्नाथ गवळी, शिवसेना उपतालुकाप्रमुख रोहित चव्हाण, सरपंच मधुकर भंडारी, उपसरपंच प्रकाश नन्नवरे,शिवसेना शाखाप्रमुख शंकर गव्हाणे,ग्रापं. सदस्य हनुमंत शिंदे, दशरथ चौगुले, विद्यार्थीसेना उपजिल्हाप्रमुख विकास भोसले तसेच प्रगतीशील शेतकरी सुहास पेशवे, किशोर हंगरगेकर, गोरोबा चव्हाण,आण्णासाहेब भोसले, लक्ष्मण गायकवाड, रणजित गव्हाणे,नेताजी नन्नवरे, संजय शेळके, अनिल क्षीरसागर, किशोर चव्हाण, अंगद गव्हाणे, चेतन चव्हाण तसेच ग्राम

Related posts