30.7 C
Solapur
September 28, 2023
उस्मानाबाद  तुळजापूर

संभाजी ब्रिगेड जिल्हा उस्मानाबाद उपाध्यक्षपदी नरवडे, तर तुळजापुर तालुकाध्यक्षपदी गायकवाड

साईनाथ जगन्नाथ गवळी
तुळजापूर/उस्मानाबाद (धाराशिव)
प्रतिनिधी,

तामलवाडी, दि. 18 : संभाजी ब्रिगेड उस्मानाबाद जिल्हा उपाध्यक्षपदी अक्षय नरवडे तर तुळजापूर तालुकाध्यक्षपदी सर्जेराव गायकवाड यांची पुनश्च निवड करण्यात आली आहे. तुळजापूर तालुक्यातील पिंपळा बु. येथील अक्षय नरवडे यांची संभाजी ब्रिगेडच्या जिल्हा उपाध्यक्षपदी तसेच तामलवाडी येथील शिवरत्न प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष सर्जेराव गायकवाड यांची संभाजी ब्रिगेडच्या तुळजापूर तालुकाध्यक्षपदी पुनश्च निवड करण्यात आली आहे.

दि.१६ रोजी संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष ॲड. तानाजी चौधरी यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन अक्षय नरवडे व सर्जेराव गायकवाड यांचा पुस्तक देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी संभाजी ब्रिगेडची वैचारिक चळवळ ही गावोगावी पोहचविण्यासाठी प्रयत्न करावेत असे जिल्हाध्यक्ष चौधरी यांनी बोलताना सांगितले.

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष ॲड तानाजी चौधरी,जिल्हा सचिव आशिष पाटील, विधानसभा अध्यक्ष निरंजन करंडे, नागेश घोटकर, नामदेव सुरवसे आदी संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Related posts