उस्मानाबाद  तुळजापूर

ई-लर्निंग बाल संमेलन स्पर्धेत सैनिकी विद्यालयाचे घवघवित यश.

साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले,
विभागीय संपादक – मराठवाडा.

तुळजापूर – 14 नोव्हेबर 2020 रोजी बालदिनानिमीत्त शासनाने आयोजित केलेल्या ऑनलाईन ई-लर्निंग बाल संमेलन स्पर्धेत तुळजापूर येथील सैनिकी विद्यालयाने घवघवीत असे यश संपादित केले आहे.

या ऑनलाइन ई-लर्निंग बाल संमेलन स्पर्धेत श्री तुळजाभवानी सैनिकी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा इयत्ता नववी मध्ये शिक्षण घेत असलेला कु. अभ्युदय दिगंबर हुंडेकरी याचा प्रथम क्रमांक आला असून ऑनलाईन चित्रकला व पोस्टर स्पर्धेत द्वितीय क्रमांकाने यशस्वी झाला आहे. कु. अभ्युदय दिगंबर हुंडेकरी याने इ.१ली ते इ.१२वी गट प्रथम क्रमांक (बालसाहित्य ई-संमेलन) तसेच इ.९वी ते इ.१०वी गट द्वितीय क्रमांक (पोस्टर बनविणे) असे घवघवीत यश संपादन केले आहे.

त्याच्या घवघवीत यशामध्ये विद्यालयाचे प्राचार्य श्री घोडके व्ही बी व चित्रकला शिक्षक श्री पांचाळ डी .एस. यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल विद्यालयाचे प्राचार्य श्रीमान घोडके सर तसेच विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले व शालेय स्तरावर सर्वत्र कौतुक होत आहे.

Related posts