24.6 C
Solapur
November 10, 2024
उस्मानाबाद  तुळजापूर

राष्ट्रीय महामार्ग क्र.166 वर तुळजापुर येथिल रिंगरोडवर ओव्हर ब्रीज बांधण्यात यावा – खा. ओमराजे निंबाळकर

साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले,
विभागीय संपादक-मराठवाडा.

तुळजापूर – राष्ट्रीय महामार्ग क्र.166 वर तुळजापुर येथिल रिंगरोडवर ओव्हर ब्रीज बांधण्यात यावा यासाठी पाठपुरावा करणार असल्याची माहिती खा. ओमराजे निंबाळकर निंबाळकर यांनी दिली.

दि. 2 एप्रिल 2021 रोजी नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग क्र.166 वर तुळजापुर येथील रिंगरोडवर तीन वाहनांचा अपघात झाल्याचे वृत्त समजताच मा. खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी प्रकल्प संचालक राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण नांदेड यांना तुळजापुर येथील रिंगरोडवर ओव्हर ब्रीज बांधण्यासाठी सुचना केल्या आहेत.

तुळजापुर शहरातील वाहतुक सुरळीत होण्यासाठी शहराच्या बाहेर रिंगरोड बनवला असून सदर रिंगरोड दोन राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा असल्याने हा मार्ग कायम रहदारीचा आहे. तुळजापुर शहरापासून साधारण तीन किमी अंतरावर रिंगरोडवर काल तीन वाहनांचा अपघात घडून मोठ्या प्रमाणात जीवित व वित्तहानी झाली. तसेच याठिकाणी मागील 6 महिन्यांपासून सातत्याने अपघात होत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले होते. काल झालेल्या अपघाताचे वृत्त कळताच नागरिकांकडून येथे होत असलेल्या अपघाताबाबत मा. खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्याकडे तक्रार आल्या होत्या.

मा.खा. ओमराजे निंबाळकर यांनी त्वरीत त्या प्रश्नात लक्ष घालुन संबंधीत अधिकारी प्रकल्प संचालक, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, नांदेड यांना यासंबंधात तात्काळ लक्ष घालुन त्याठिकाणी ओव्हरब्रीजची बांधणी करण्यासंदर्भात सुचना दिल्या आहेत. तसेच रस्त्यावर आवश्यक त्याठिकाणी गतीरोधक, रेडीयम साइनबोर्ड व आवश्यक त्या ठिकाणी विद्युतीकरण करण्याच्या संदर्भात सुचना देण्यात आलेल्या आहेत.

सदर ठिकाणी ओव्हरब्रीजचे बांधकाम झाल्यास अपघात टाळता येऊन वाहतुक सुरळीत व सुरक्षीत होईल अशी आशा व्यक्त केली आहे.

Related posts