यंदाचे 4 थे वर्ष
सामाजिक परिवर्तनासाठी एकजुटीने प्रयत्नशील राहण्याचा संकल्प घेवुन सामाजिक परीवारात सामिल झालेल्या सर्व मान्यवरांचे आभार
शहर प्रतीनीधी-
-मानव प्रजाती मध्ये जन्मघेतल्यानंतर ज्या समाजातून आपण घडतो त्या समाजाचे आपण काहीतरी देणं लागतो या हेतूने मातृऋण ,पितृऋण,गुरुऋण व मित्रऋण याच्या पलीकडे हि जाऊन समाजऋण फेडायची जबाबदारीच्या उध्येशाने काही कार्यकर्ते सामाजिक योगदान देत असतात.
सोलापूर शहरामध्ये कार्य करणारया सामाजिक संस्था व सामाजिक कार्यकर्ते यांच्या विचारांची,कार्याची देवाण घेवाण व्हावी आणि सारे एकत्र येऊन प्रयत्न केल्यास सामाजिक प्रगती तथा परिवर्तन होण्यास मदत होइल या हेतूने गेल्या तीन वर्षां पासून सामाजिक परिवाराच्या माध्यमातून सामाजिक संस्थांचा व सामाजिक कार्यकर्त्यांच्या स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात येते. चौथ्या वर्षाच्या मेळाव्याचे आयोजन दाळगे प्लॉट येथील हनुमान मंदिरात करण्यात आले होते. या वेळी सोलापुरात कला,क्रीडा,सांस्कृतिक,आरोग्य,युवा विकास,महिला सक्षमीकरण,राजकीय,औद्योगिक अश्या विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांचा सक्रिय सहभाग होता.
सदर मेळाव्यात सामाजिक कार्यकर्त्यांनी एक मेकांच्या कार्याची ओळख करून घेत सामाजिक प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
याप्रसंगी मयूर गवते यांनी प्रस्ताविक केले,राहुल बिराजदार यांनी सामाजिक परिवाराची भूमिका स्पष्ट केली तर महेश लोंढे यांनी आभार मानले.
समाज निर्मिती व राष्ट्रनिर्मितीसाठी कार्य करणार्या सोलापुरातील सर्व संघटना ऐकत्रित काम केले तर खुप मोठे परिवर्तन होईल आणी विधायक कामा साठि खुप मोठि ताकत निर्माण होईल तरि सामाजिक क्षेत्रात कार्य करणार्यांनी सामाजिक परिवारा मध्ये सहभागी व्हावे असे आव्हान मयुर गवते यांनी सामाजिक परिवाराच्या वतीने केले.
सदर वेळी अपरिचित सामाजिक संस्था, सक्षम सामाजिक संस्था, आस्था सामाजिक संस्था, श्रीमंतयोगी सामाजिक संस्था, प्रार्थना सामाजिक संस्था,मातोळी सामाजिक संस्था, सोमा फाऊंडेशन,शिवशंभो सामाजिक संस्था ,शिवबसव सामाजिक संस्था, ईको नेचर सामाजिक संस्था,शिवशिंपि सामाजिक संस्था, जय हिंद फुड बॅक, भुईकोट किल्ला संवर्धन,ऐम जे प्रथम मानव संस्था, साईकिल्ला सामाजिक संस्था, स्वराज्य विर सामाजिक संस्था, शिवलिला सामाजिक संस्था, शिव राष्ट्र प्रतिष्ठान, मराठा सेवा संघ,रेवन कोळी मित्र परिवार,पुष्कराज युवक मंडळ, शहिद अशोक कामटे विचार मंच,आस्था रोटि बॅक आदि व सामाजिक क्षेत्रात काम करणार्या व्यक्तीचा सहभाग होता.