उस्मानाबाद 

आपल्याच नेत्यांची काळजी करण्याची सद्बुद्धी परमेश्वर भाजप जिल्हाध्यक्षांना देवो ; तालुकाप्रमुख सतीश सोमाणी यांची टीका.

धाराशिवचे पालकमंत्री ना. शंकरराव गडाख यांना कोरोनाची लागण. ; पालकमंत्र्यांच्या उपस्थिती वरून सेना-भाजपात जुंपली.

साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले,
विभागीय संपादक-मराठवाडा.

उस्मानाबाद ता. 5 ः जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांना कोरोनाची लागन झाली असुन ते सध्या घरीच विलगीकरणामध्ये उपचार घेत असल्याची माहिती शिवसेनेचे तालुकाप्रमुख सतिषकुमार सोमानी यांनी दिली.

पालकमंत्री श्री. गडाख दररोज जिल्ह्याच्या कोरोनाच्या परिस्थितीचा नियमित आढावा घेत आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हाधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी सबंधित यंत्रणेशी सातत्याने संवाद साधुन उपाययोजना राबविण्याचे काम पालकमंत्री श्री.गडाख अत्यंत प्रामाणिकपणे करत असताना भाजपाच्या पदाधिकाऱ्यांना या काळाचे गांभीर्य दिसत नसल्याची खंत श्री. सोमानी यानी व्यक्त केली. सध्याचा काळ हा राजकीय वक्तव्ये करुन प्रसिध्दी मिळविण्याचा नक्कीच नाही याची जाणीव भाजपाच्या जबाबदार पदाधिकाऱ्यांना नसावी ही अत्यंत खेदाची बाब आहे. मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे साहेब यांनी कालच विरोधी पक्षांच्या नेत्यांना सहाकार्य करण्याची विनंती केलेली होती. विशेष म्हणजे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सुध्दा त्याला प्रतिसाद देत सहकार्याबद्दल विश्वास व्यक्त केला आहे.

एका बाजुला भाजपाचे राज्याचे नेते एक भुमिका घेतात तर दुसऱ्या बाजुला जिल्ह्याचे पदाधिकारी त्यांच्याच परस्परविरोधी भुमिका घेताना आश्चर्य वाटते. लोकशाहीत दिलेल्या अधिकारानुसार प्रत्येकालाच अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, त्यामुळे त्यानी काय करावे हा त्यांचा प्रश्न आहे, पण जेव्हा तुमचे प्रमुख नेते भुमिका मांडतात किमान तेव्हा तरी त्यांच्या भुमिकेशी प्रतारणा होणार नाही याची काळजी घेण्याची सद्बबुध्दी जिल्हाध्यक्षांना द्यावी अशी आम्हीही प्रार्थना करत असल्याचा टोला श्री. सोमानी यानी लगावला.

हा काळ आपत्तीचा आहे, या काळात सार्वत्रिक प्रयत्नाची गरज असुन सगळ्यांनी मिळुन कोरोनाच्या संकटाचा सामना करायचा आहे. अशावेळी राजकीय मतभेद बाजुला ठेवुन प्रामाणिकपणे एकत्र येऊन काम केले तर त्याचा चांगला परिणाम दिसुन येईल असा विश्वास श्री. सोमानी यानी व्यक्त केला. राजकारण करण्यासाठी आपल्याला भरपुर वेळ असुन त्यावेळी आम्ही खंबीर आहोतच पण अशा गंभीर गोष्टीमध्ये राजकारण आणु नये अशी विनंती श्री. सोमानी यांनी भाजपाच्या पक्षातील पदाधिकाऱ्यांना केली आहे. पालकमंत्री श्री. गडाख तत्पर आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्याची आरोग्य यंत्रणा सक्षमपणे काम करत असुन यापुढेही त्यात अडचण येणार नसल्याचा विश्वास श्री. सोमानी यावेळी यानी व्यक्त केला.

Related posts