27.5 C
Solapur
September 27, 2023
उस्मानाबाद 

धाराशिव (उस्मानाबाद) चे खा. ओमराजे निंबाळकर व त्यांच्या सौभाग्यवती यांना कोरोनाची लागण.

साईनाथ जगन्नाथ गवळी-भोसले,
विभागीय संपादक-मराठवाडा.

धाराशिव (उस्मानाबाद) – धाराशिव(उस्मानाबाद) चे लोकप्रिय खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना व यांच्या पत्नी तथा शकुंतलादेवी नागरी पतसंस्था च्या अध्यक्षा, सौ. संयोजनी राजेनिंबाळकर यांनाही कोरोनाची लागण झाली आहे.

धाराशिव (उस्मानाबाद) लोकसभेचे विद्यमान खासदार, ओमप्रकाश राजेनिंबाळकर तसेच मा. खासदार यांच्या पत्नी तथा शकुंतलादेवी नागरी पतसंस्था च्या अध्यक्षा, सौ. संयोजनी ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. खा. ओमराजे निंबाळकर यांनी गेले वर्षभर कोरोनाकाळात आपले कर्तव्य अगदी चोखपणे पार पाडत अख्ख्या मतदारसंघातील लोकांची काळजी घेतली. कोरोनाकाळात जिथे कुठे कोरोना पेशंट सापडेल तेथे जाऊन प्रत्यक्षपणे भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेत नागरिकांना आवश्यक ती काळजी घेण्याची विनंती केली. अख्खा मतदारसंघ हाच आपला परिवार याप्रमाणे जनतेची काळजी घेतली.

मा. खा. यांच्या पत्नी सौ. संयोजनी ओमप्रकाश राजेनिंबाळकर या सुद्धा त्यांच्या खांद्याला खांदा लावून जनतेच्या सेवेत तत्पर होत्या. या दोन्ही पती-पत्नी जोडीने कोरोनाकाळात केलेल्या कार्यामुळे जनतेचे आशीर्वाद त्यांना आहेत व ते दोघेही बरे होऊन जनतेच्या सेवेत लवकरच रुजू होतील अशी भावना कार्यकर्त्यांमधून व्यक्त होत आहे.

तुळजापूर शिवसेनेच्या वतीने खा. ओमराजे निंबाळकर व वहिणीसाहेब सौ. संयोजनी ओमप्रकाश राजेनिंबाळकर लवकरात लवकर बऱ्या व्हाव्यात यासाठी तुळजापूर शिवसेनेचे तालुकाप्रमुख श्री. जगन्नाथ गवळी-भोसले यांच्या वतीने आई तुळजाभवानी कडे साकडे घालण्यात आले आहे.

Related posts