अशोक सोनकंटले – प्रतिनिधी दक्षिण सोलापूर
दक्षिण सोलापूर तालुक्यातील मंद्रूप पोलीस ठाण्याच्या हद्दीत विनाकारण रस्त्यावर फिरणार्या तसेच मास्कचा वापर न करण्यावर मंद्रूप पोलीसांनी कारवाई करीत पाच जणांना ताब्यात घेतले आहे. तर अठरा जणांवर एकूण दहा हजारांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
मंद्रूप येथे विनाकारण फिरणार्यावर कारवाई करताना मंद्रूपचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डाॅ.नितीन थेटे,हवालदार शहाजी कांबळे,दिंगबर गेजगे व जाधव
सध्या देशभरात कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव वाढत आहे, त्यामुळे शासन कोरोना बाधितांचे संख्या कमी व्हावी यासाठी संचारबंदी लागू केली.
गुरूवारी,मंद्रूपचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डाॅ.नितीन थेटे,हवालदार शहाजी कांबळे,दिंगबर गेजगे, सुनंदा स्वामी,जाधव यांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत फिरून विनाकारण रस्त्यावर फिरणार्या पाच जणांना ताब्यात घेतले आहे.तर मास्कचा वापर न करणा-या अठरा जणांवर दंडात्मक कारवाई केली आहे.
यावेळी बोलताना सहाय्यक पोलिस निरीक्षक डाॅ. थेटे म्हणाले,मंद्रूप पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व गावातील नागरिकांनी शासनाने कोरोनाविषयक दिलेल्या विविध आदेशाचे पालन करावेत,अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नयेत,अत्यावश्यक कामासाठी बाहेर पडताना मास्कचा वापर करावेत. सोशल डिस्टन्सींग पाडावेत, गर्दी करु नयेत,सोबत सॅनिटायझर बाळगावेत,जर कोरोनाविषयक नियम मोडल्यास त्यांच्यावर कडक कारवाई येईल.यात कोणाचेही गय केली जाणार नाही.